Weight Loss: वजन कमी करण्यासाठी आंबाही आहे फायदेशीर, खाण्याची आहे ही पद्धत

सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात एकच गोष्ट चांगली म्हणजे आंबा. आंबा कुणाला नाही आवडत? आंबा खाण्यासाठी जितका चवदार आहे तितकाच फायदेशीर आहे. आंब्यामुळे वजन कमी होतं हे फार कमी जणांना माहित आहे. आंब्यात फायबर, विटॅमिन सी, कोपर, फोलेट, विटामिन A,E,B5,Kआणि B 6 असतं. तसेच आंब्यात पोटॅशियम, मॅग्निशियम आणि मॅगनीजही असतं. आंब्यातील ही तत्वं शरीरासाठी उपयुउक्त असतात. 

mango and weight loss
वजन कमी करण्यासाठी आंबाही आहे फायदेशीर  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात एकच गोष्ट चांगली म्हणजे आंबा.
  • आंबा खाण्यासाठी जितका चवदार आहे तितकाच फायदेशीर आहे.
  • आंब्यामुळे वजन कमी होतं हे फार कमी जणांना माहित आहे.

Weight Loss & Mango : मुंबई : सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात एकच गोष्ट चांगली म्हणजे आंबा. आंबा कुणाला नाही आवडत ? आंबा खाण्यासाठी जितका चवदार आहे तितकाच फायदेशीर आहे. आंब्यामुळे वजन कमी होतं हे फार कमी जणांना माहित आहे. आंब्यात फायबर, विटॅमिन सी, कोपर, फोलेट, विटामिन A,E,B5,Kआणि B 6 असतं. तसेच आंब्यात पोटॅशियम, मॅग्निशियम आणि मॅगनीजही असतं. आंब्यातील ही तत्वं शरीरासाठी उपयुउक्त असतात. 


वजन कमी करण्यासाठी आंबाही फायदेशीर ठरतो. आंबा खाणे आरोग्यासाठी योग्य आहे आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं असे डाएटिशन ऋजुता दिवेकर यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे. ज्यांन्ना मधुमेह आहे तसेच लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनाही आंबा फायदेशीर आहे. आंब्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. 


असा खा आंबा आणि घटवा वजन

वजन कमी करण्यासाठी आंब्याचाही उपयोग होतो. वजन कमी करण्यासाठी आंबा कापा आणि आंब्याचा शेक बनवून प्या. आमरसामुळे वजन कमी होत नाही उलट वाढतं. त्यामुळे आमरस खाणे टाळा. तसेच सीजन आहे म्हणून तुम्ही मोठ्या प्रमाणात आंबे खाणे चुकीचे आहे. वजन कमी करण्यासाठी दिवसाला एक आंबा पुरे. आंब्यात मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. जास्त कॅलरी घेतल्याने तुमचे वजन कमी होणार नाही. 

यावेळी खा आंबा

वजन कमी करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो. व्यायाम केल्यानंतर तुम्ही आंबा खाऊ शकता. व्यायाम केल्यानंतर आंबा खल्ल्यामुळे एनर्जी बूस्ट होते. 


मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल वाढत नाही 

तज्ञांनुसार आंब्यात मँगिफेरिन असतं. हे तत्व बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असून त्यात अनेक औषधी गुण असतात. मधुमेह, कर्करोग आणि हृदयांचा उपचारासाठी ते फायदेशीर ठरतं. आंब्याचा ग्लाइसेमिक इंडेक्ट ५१ आहे. आंबा कमी ग्लाइसेमिक इंडेक्ट पदार्थ आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते . वजन कमी करण्यासाठी ताजी फळं खावी असा सल्ला ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी