Weight loss : वजन कमी करण्यासाठी रोज प्या लवंगचा चहा, चटकन कमी होईल वजन

तब्येत पाणी
Updated Apr 09, 2021 | 20:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुम्हाला जर चहा प्यायला आवडत असेल तर रोज लवंग असलेला हा पीत जा. हा चहा प्यायल्याने तुमचे रक्ताभिसरण चांगले होईल आणि शरीरातील चरबी कमी होऊन वजनही आटोक्यात येईल.

Spicy tea useful for weight loss
लवंगयुक्त चहा वजन करण्यासाठी उपयुक्त 

थोडं पण कामाचं

  • रोज लवंग असलेला हा प्यावा
  • लवंगमुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारेल
  • शरीरातील चरबी कमी होईल आणि वजन आटोक्यात येईल

नवी दिल्ली : भारतीय मसाले हे फक्त स्वादिष्टच नसतात तर ते आरोग्यासाठी लाभदायीसुद्धा असतात. बहुतांश मसाल्यांचा वापर आपण आपल्या जेवणात करत असतो. कित्येक मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म सुद्धा असतात. लवंग हा असाच प्रत्येक घरात असणारा पदार्थ. तुमचे वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी लवंग उपयुक्त आहे. यामध्ये अॅंटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते आणि चरबी कमी होते.

जर तुम्हाला चहा प्यायला आवडत असेल तर रोजच्या चहात लवंगचा समावेश करावा. लवंगमुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारेल. त्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होईल आणि वजन आटोक्यात येईल. लवंगचा चहा प्यायल्याने होणारे फायदे समजून घेऊया.

लवंगवाला चहा कसा बनवावा


२ कप पाणी
चार ते पाच लवंग
दालचिनीची स्टीक
अर्धा इंच आलं
लिंबूचा रस

चहाची रेसिपी


एका भांड्यात पाणी घ्या आणि ते उकळल्यानंतर ४ ते ५ लवंग, अर्धा स्टिक दालचीनी आणि आलं किसून त्यात टाका. जवळपास १५ ते २० मिनिटे हे सर्व उकळा. त्यानंतर हे सर्व गाळून घ्यावे आणि त्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबूचा रस टाकावा.

वजन कमी करण्यास उपयोगी


हा मसाला चहा तुमच्या पचन क्रियेसाठी अत्यंत लाभदायी असतो. यामध्ये असलेल्या लवंग आणि इतर पदार्थांमुळे पचनशक्ती सुधारते. रोज याचे सेवन केल्याने अतिरिक्त वजन घटते. आपल्या शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्याचे काम मसाले करत असतात. रक्ताभिसरण सुधारले की चरबी किंवा कॅलरी खर्च होतात आणि कमी होतात.

स्कीन इन्फेक्शन


लवंगमध्ये अॅटीसेप्टीक गुणधर्मदेखील असतात. त्यामुळे त्वचेच्या तक्रारीदेखील दूर होतात. लवंग शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. याशिवाय ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचेही काम लवंग करते. यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या, ब्लेमिश आणि वार्धक्याच्या खुणा कमी होतात.


सायनसपासून सुटका


ही खास चहा तुम्हाला सायनसपासून सुटका मिळवून देतो. मसाल्यांमध्ये असलेल्या यूजेनॉलमुळे शरीरातील कफ कमी होण्यास मदत होते. लवंगमध्ये व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के सुद्धा असते. त्यामुळे विषाणूंविरुद्धची प्रतिकारक्षमता शरीरात तयार होते. याशिवाय हा चहा तुमचा तापसुद्धा बरा करतो.

दातांसाठीही उपयोगी


या चहात अॅंटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे दात आणि हिरड्यांच्या तक्रारी, दुखणे कमी होण्यास मदत होते. हा हर्बल चहा तोंडातील विषाणू कमी करण्यास मदत करतो. यामुळे दातांच्या समस्यांपासून तुमची सुटका होईल.

लवंगचा चहा पिण्याचे दुष्परिणाम


मसाल्याचा चहा आरोग्यास उपयोगी असतो. मात्र या चहाचे गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास तुम्हाला त्याचा अपाय होऊ शकतो. लवंगचा चहा दिवसातून एक किंवा दोन वेळाच प्यावा. जास्त प्रमाणात याचे सेवान केल्यास स्नायू, पोट यांच्या तक्रारी उद्भवू शकतात. गर्भवती आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांनी याचे अधिक सेवन करू नये. गरजेपेक्षा जास्त मसाले तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. जर हा चहा प्यायल्यावर तुम्हाला मळमळ किंवा उलटीसारखे वाटत असेल तर हा चहा पिऊ नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी