Weight Loss Tips: व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही? वजन कमी करण्यासाठी करा घरच्या घरी करा हे सोपे उपाय

Weight Loss Tips:  सध्या अनेक जणांसमोर वजन वाढण्याची समस्येने त्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय उपाय करतात, कोणी जिममध्ये जाऊन व्यायाम करतं, कोणी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतं तर कुणी सकाळी धावायला जातं. या सगळ्यांनी हवे तसे रिझल्ट्स मिळतीलच असे नाही. तसेच काही जणांना वजन कमी करताना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतोच असे नाही. आज आपण जाणून घेऊया जर तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर घरच्या घरी काय उपाय करता येतील.

weight loss
वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हे सोपे उपाय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या अनेक जणांसमोर वजन वाढण्याची समस्येने त्रस्त आहे.
  • वजन कमी करताना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतोच असे नाही.
  • जाणून घेऊया जर तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर घरच्या घरी काय उपाय करता येतील.

Weight Loss Tips:  सध्या अनेक जणांसमोर वजन वाढण्याची समस्येने त्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय उपाय करतात, कोणी जिममध्ये जाऊन व्यायाम करतं, कोणी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतं तर कुणी सकाळी धावायला जातं. या सगळ्यांनी हवे तसे रिझल्ट्स मिळतीलच असे नाही. तसेच काही जणांना वजन कमी करताना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतोच असे नाही. आज आपण जाणून घेऊया जर तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर घरच्या घरी काय उपाय करता येतील. (weight loss follow this easy home remedies for better result weight loss read in marathi)

अधिक वाचा :  Signs of bad stomach : तुमच्या पोटात ‘ऑल इज नॉट वेल’! सांगतात ‘ही’ लक्षणं

लिंबू आणि मध

Lemon-honey decoction

लिंबूमध्ये विटामिन सी असतं, त्यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होतं. तर मधात नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

कोबी

Cabbage

कोबीमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असतं तसेच योग्य प्रमाणात फायबर असतं. कोबीपासून तुम्ही सूप, भाजी आणि सलाड बनवून खाऊ शकता, त्यामुळे वजन कमी होईल.

अधिक वाचा :  Raju Shrivastav Death: कार्डिएक अरेस्टने घेतला राजू श्रीवास्तव यांचा बळी, ही लक्षणं दिसली तर वेळीच व्हा सावधान!

पाणी

 Why it is important to monitor daily water intake

वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेट असणे फार गरजेचे आहे. दिवसातून किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यायलास पोट भरलेलं राहतं. त्यामुळे भूक लागत नाही आणि ओवरइटिंग होत नाही. ओवरइटिंग न झाल्यामुळे वजन वाढत नाही. 


गाजर

How to make Gajar ki kheer, How to make Gajar ki kheer in simple style, Homemade Gajar ki kheer, How to make Gajar ki kheer in market style, How to make Gajar ki kheer at home, How to make Gajar ki kheer at home in hindi, ?? ?? ???? ?? ??? ???? ?????, ??
गाजर ही लो कॅलरी भाजी आहे, गाजर खाऊन वजन नियंत्रणात ठेवता येतं. याशिवाय गाजरमध्ये योग्य प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

बडीशेप

Fennel

वजन कमी करण्यासाठी बडीशेपचा फायदा होतो. बडीशेपमध्ये फायबर असतं त्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा : Eye care tips: या चुकीच्या सवयींमुळे होतं डोळ्यांचं नुकसान, आजच सोडा!

ग्रीन टी

green tea side effect

ग्रीन टीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमुळे शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. 

काकडी

cucumber benefits

काकडी खाल्ल्यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत होते. काकडीमध्ये योग्य प्रमाणात पाणी असतं आणि पाण्यामुळे शरीरातील वजन नियंत्रणात राहतं.

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी