Health tips: मुंबई : सध्या वजन वाढण्याची समस्या प्रत्येकाला जाणवत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास व्यायाम करतात आणि घाम गाळतात. पण एवढी मेहनत केल्यानंतरही आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत. यासाठी आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करण्याची गरज आहे. आपल्या काही सवयींमध्ये बदल केल्यास नक्कीच वजन लवकर होण्यास मदत होईल. (weight loss follow this simple tips for better result in weight loss in marathi)
फक्त योगा आणि व्यायाम करून वजन कमी होत नाही तसेच बॉडी हव्या त्या शेपमध्ये येत नाही. यासाठी लाईफस्टाईलमध्ये बदल केल्यास नक्की फरक पडेल.
वजन कमी करण्यासाठी झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. झोप पूर्ण न झाल्याने हार्मोनलचे तंत्र बिघडतं आणि त्यामुळे तब्येत बिघडते. तसेच जेवणात विटामिन डी चा मोठ्या प्रमाणात समावेश करावा.
एकदाच भरपूर खाल्ल्याने वजन वाढतं. अशावेळी थोडं थोडं खाणे गरजेचे आहे. जेवणात सर्व प्रकारचे धान्य, कमी फॅट असलेले मांस, हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाणी फायदेशीर ठरतं. अशावेळी सकाळी सकाळी मेथीचे पाणी प्या. यामुळे पचनशक्ती मजबूत होते, तसेच विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी बाहेरचे अन्न टाळा आणि फक्त्त घरचे अन्न खाण्यावर भर द्या. बाहेरच्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल असतं. यामुळे शरीरात एक्स्ट्रा कॅलरी जाणार नाही आणि तुमचे वजन वाढणार नाही.
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.