weight loss tips: आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेकजण वजन वाढीच्या समस्येने ग्रासले आहेत. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक विविध उपाय योजना करतात. कोणी खाण्यापिण्यावर बंधनं आणतं तर कोणी व्यायाम करण्यासाठी जिमचा रस्ता पकडत असतो.वाढलेलं वजन अनेकांच्या चिंतेचं कारण असतं. (Have you heard? 5 kg weight will be reduced in just one month; Just follow these tips)
अधिक वाचा : Dasara Vs Bholaa आयएमडीबी वर 'भोला' ने 'दसरा' ला पाडले मागे
लठ्ठपणा केवळ शारीरिक स्वरूपावर परिणाम करत नाही तर हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी आणि यासारख्या आजारांना जन्म देतो. यामुळे वजन कमी करणं हे निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. वजन कमी करणं हे मोठं आव्हान बनलं आहे. घाबरू नका कारण आम्ही आज असा एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही एक महिन्यात 5 किलो वजन कमी करू शकतात.
अधिक वाचा : कधी आहे हनुमान जयंती? काय आहे या दिवसाचे महत्त्व?
वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीचे सेवन केलं पाहिजे. जितकी कॅलरी जाळली जाते त्याच्या तुलनेने कमी कॅलरीचा उपयोग शरीरारासाठी होत असतो. प्रत्येक आठवड्याला 0.5-1 किलोग्राम वजन कमी करण्यासाठी एक सुरक्षित आणि ठराविक कॅलरी हवी. दररोजज 500 ते 1000 कॅलरी कमी करावी लागेल. कॅलरी कमी करण्यासाठी योग्य आहार घ्यावा लागेल आणि व्यायाम करावा लागेल.
अधिक वाचा :अयोध्येच्या ऋषी सिंहने जिंकले इंडियन आयडॉल 13ची ट्रॉफी
फळं, भाज्या, कडधान्य, लीन प्रोटीन, आणि प्रथिने हे पोषक घटक आवश्यक असतात. यामुळे आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. प्रक्रिया केलेलं अन्न आणि जंक फूड खाणं टाळावे. यात साखर आणि प्रथिने अधिक असतात. भोजन डायरी किंवा कॅलरी ट्रॅकिंग अॅपच्या माध्यमातून आपल्या कॅलरीचं सेवन करा.
अधिक वाचा : मित्रांना,परिवाराला मराठीतून द्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा
आठवड्यातील काही दिवस तरी व्यायाम केला पाहिजे. साधारण 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. या व्यायामात जलद चालणं, सायकल चालवणं, पोहणं, हे व्यायाम केलं पाहिजे. व्यायाम कॅलरी करण्यास मदत करते. तसेच स्नायूंना मजबूत करणे आणि पचन चांगलं करण्यासही मदत करत असते.
शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायले पाहिजे. भरपूर पाणी प्यायल्याने पचनक्रिया वाढत असते. दररोज कमीत-कमी 8- 10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे.
जर तुम्ही कमी झोप घेत असाल किंवा झोप पूर्ण होत असेल तर त्याचा परिणाम हा मेटाबॉलिज्म आणि भूकेवर होत असतो. वजन कमी करायचे असेल तर दरदिवशी 7-8 तास झोप घेणं आवश्यक आहे.
टीप - लक्षात ठेवा वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आणि संयम असणं आवश्यक आहे. वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.