Weight loss tips: उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी प्या हे ज्यूस

तब्येत पाणी
Updated May 04, 2021 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

तज्ञांच्या मते कलिंगडामध्ये ९४ टक्के पाणी असते. यात फायबर असते. त्यामुळेच त्याला समर फ्रुट म्हटले जाते. वाढत्या वजनाने त्रस्त असलेल्या लोकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडाचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरते.

weight loss
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी प्या हे ज्यूस 

थोडं पण कामाचं

  • तज्ञांच्या मते केवळ अन्न खाल्ल्यानेच कॅलरीज वाढत नाहीत. तर पेय पदार्थ प्यायल्यानेही कॅलरीज वाढतात
  • काकडीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो

मुंबई: वाढते वजन कंट्रोल करण्यासाठी कॅलरी काऊंट गरजेचा आहे. तसेच दररोज पुरेशा प्रमाणात कॅलरीज बर्नही होणे गरजेचे असते. यामुळेच तुम्ही लठ्ठपणावर नियंत्रण मिळवू शकता. तज्ञांच्या मते केवळ अन्न खाल्ल्यानेच कॅलरीज वाढत नाहीत. तर पेय पदार्थ प्यायल्यानेही कॅलरीज वाढतात. यासाठी कोल्ड्रिंक्ससह बाजारात उपलब्ध असलेले ज्यूस पिणे टाळा. यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळे लठ्ठपणाचा धोका अधिक वाढतो. नाहीतर घरात ताज्या फळांचा ज्यूस बनवून प्या. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर हायड्रेट राहतील अशी फळे बाजारात उपलब्ध असतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. हे पेय पदार्थ प्यायल्याने वजन नियंत्रित राहते आणि शरीरही हायड्रेट होते.

काकडीचा ज्यूस प्या

काकडीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. सोबतच यात मोठया प्रमाणात फायबर असतात. ज्यामुळे सतत खाण्याची सवयही कमी होते. तसेच जेवणही उशिराने पचते. तज्ञांच्या मते लठ्ठपणाने त्रस्त असलेल्यांनी Cucumber Diet Plan फॉलो करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हालाही वजन कमी करायचे असल्यास तुम्ही दररोज काकडीचा ज्यूस पिऊ शकता.

बीटाचा ज्यूस

यात फायबर, फोलेट, मँगनीज, पोटॅशियम, आर्यन आणि व्हिटामिन सी पुरेशा प्रमाणात असते. फायबरयुक्त ज्यूस पिण्याने वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येते. यासाठी रिकाम्या पोटी दररोज सकाळी बीटाचा ज्यूस प्या. तुम्ही या दोघांपैकी कोणताही ज्यूस पिऊ शकता.

तसेच वजन घटवण्यासाठी तुम्ही दररोज कलिंगडाचे सेवन करू शकता.  

कढीपत्त्याच्या ज्यूसनेही होते वजन कमी

  • कढीपत्त्याची पाने पाण्यात उकळा. 
  • त्यानंतर थोड्यावेळाने गॅस जोरात करून पाण्यात एकदा उकळा.
  • यात आता मध आणि लिंबूचा रस टाकावा. 
  • आता ज्यूस किंवा चहा प्रमाणे गरमा गरम पिवून घ्या.
  • दररोज हा रस पिल्याने पाचन तंत्राचा बराच फायदा होतो.
  • रिकाम्या पोटी हा रस पिण्याचा प्रयत्न करा. तरच त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी