weight Loss : फक्त दोन आठवड्यात कमी करा 6 किलो वजन, उपकरणाच्या मदतीने लठ्ठपणाची समस्या होणार दूर

जेव्हापासून कोरोनाचे हाहाकार सुरू झाला, तेव्हापासून लोकांना त्यांची कामे घरी बसून करण्यास आवडू लागले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याच्या समस्या तर वाढत आहेत. वजनही सतत वाढत असल्याने अनेकांना लठ्ठपणाचा त्रास होऊ लागला आहे.

Lose 6 kg weight in just two weeks
फक्त दोन आठवड्यात कमी करा 6 किलो वजन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • उपकरणाच्या मदतीने कमी करा लठ्ठपणा
  • लठ्ठपणा कमी करण्यासाठी जास्त व्यायाम करण्याची गरज नाही.
  • ब्रिटन आणि न्यूझीलंडमधील शास्त्रज्ञांनी वजन कमी करणारे उपकरण तयार केले आहे

weight  Loss : नवी दिल्ली : जेव्हापासून कोरोनाचे हाहाकार सुरू झाला, तेव्हापासून लोकांना त्यांची कामे घरी बसून करण्यास आवडू लागले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याच्या समस्या तर वाढत आहेत. वजनही सतत वाढत असल्याने अनेकांना लठ्ठपणाचा त्रास होऊ लागला आहे. आता लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोकांची जीममध्ये गर्दी वाढली आहे. परंतु जीममध्ये जाणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लठ्ठपणा करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज राहणार नाहीये. वजन कमी करण्यासाठी नवीन तंत्र शोधण्यात आले आहे, त्याच्या मदतीने तुमची लठ्ठपणाची समस्या दूर होणार आहे, पण यावर लोक सहजासहजी विश्वास ठेवणार नाहीत.

हे  आहेवजन कमी करणारे उपकरण

डेली मेल डॉट कॉमच्या बातमीनुसार, ब्रिटन आणि न्यूझीलंडमधील शास्त्रज्ञांनी वजन कमी करणारे उपकरण तयार केले आहे जे दात एकत्र बांधण्यासाठी चुंबक आणि लॉकिंग बोल्ट वापरतात. न्यूझीलंडमधील ओटागो विद्यापीठातील संशोधकांनी डेंटलस्लिम आहार नियंत्रण तयार केले आहे. (DentalSlim Diet Control) दंतवैद्य व्यावसायिकांद्वारे वरच्या आणि खालच्या दातांना लावले जाते. हे उपकरण परिधान केलेल्या व्यक्तीचे तोंड सुमारे 2 मिमी उघडू शकते. त्यांना लिक्विड आहारच करता येतो यंत्र लावल्याने बोलणे आणि श्वास घेण्यास कोणतीही समस्या उद्भवत नाही.

6 किलोपर्यंतचे वजन नियंत्रित केले जातं

एकदा दात बसवल्यानंतर, यंत्राचा उद्देश घन पदार्थ खाण्यापासून रोखणे हा आहे. उपकरणाच्या निर्मात्यांनी याचे वर्णन 'नॉन-इनवेसिव्ह' असे केले आहे, म्हणजे दात वारंवार पदार्थ चावण्याची प्रक्रियेस मज्जाव करते. ब्रिटिश डेंटल जर्नलमध्ये या उपकरणाच्या चाचणीमध्ये, सहभागींनी दोन आठवड्यांत सरासरी 6.36 किलो वजन कमी केले आहे.  तसेच, वजन कमी करणाऱ्या सहभागींना हा प्रवास आणखी पुढे चालू ठेवायचा आहे जेणेकरून त्यांचे वजन आणखी कमी करता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी