Weight loss popcorn : पॉपकॉर्नमुळे वजन कमी होतं ? काय सांगता? वाचा सविस्तर

पिक्चर बघताना आपण आवर्जून मकई म्हणजेच पॉपकॉर्न खातो. आता मल्टिप्लेक्समध्ये भलेही महाग मिळत असतील, पण अनेक जण खिशावर ताण देऊन चित्रपट पाहताना आवर्जून वेगवेगळ्या फ्लेव्हरचे पॉपकॉर्न खातात. आता हातात ओटीटी असल्यामुळे वेबसीरीजा पाहतानाही आपण घरच्या घरी पॉपकॉर्न बनवून खात असतो. परंतु या पॉपकॉर्नमुळे वजन कमी होण्यासही मदत होते. याबद्दल अनेकांना माहित नाही.

popcorn
पॉपकॉर्नमुळे वजन कमी होतं   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पिक्चर बघताना आपण आवर्जून मकई म्हणजेच पॉपकॉर्न खातो.
  • ओटीटी असल्यामुळे वेबसीरीजा पाहतानाही आपण घरच्या घरी पॉपकॉर्न बनवून खात असतो.
  • परंतु या पॉपकॉर्नमुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

Popcorn for Weight Loss :  पिक्चर बघताना आपण आवर्जून मकई म्हणजेच पॉपकॉर्न खातो. आता मल्टिप्लेक्समध्ये भलेही महाग मिळत असतील, पण अनेक जण खिशावर ताण देऊन चित्रपट पाहताना आवर्जून वेगवेगळ्या फ्लेव्हरचे पॉपकॉर्न खातात. आता हातात ओटीटी असल्यामुळे वेबसीरीजा पाहतानाही आपण घरच्या घरी पॉपकॉर्न बनवून खात असतो. परंतु या पॉपकॉर्नमुळे वजन कमी होण्यासही मदत होते. याबद्दल अनेकांना माहित नाही. पॉपकॉर्नचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

पॉपकॉर्नचे फायदे

अन्न पचवण्यास मदत

मकई हे आरोग्यदायी धान्य आहे. त्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. ज्यांना पोटाच्या आणि पचनाच्या समस्या आहेत. त्यांनी आवर्जून घरी बनवलेले पॉपकॉर्न खावे

कोलेस्ट्रॉल राहतो नियंत्रणात

पॉपकॉर्नमध्ये फायबर असल्याने फायबर रक्त प्रवाह थांबवून कोलेस्टॉरचे प्रमाण कमी करतो. कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने हृदयासंबंधित आजार होत नाहीत. 

ब्लड शुगर राहतं नियंत्रणात

फायबरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात येतं. मधुमेह असलेल्या रुग्णांनी फायबरयुक्त आहार घेणे गरजेचे आहे, त्यामुळे रक्ताती साखर प्रमाणित राहतं. म्हणून यासाठी पॉपकॉर्न फायदेशीर ठरतं. पॉपकॉर्न खाताना ते योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. 


वजन कमी होण्यास मदत

पॉपकॉर्न हे कमी कॅलरी असलेला पदार्थ आहे. एक कप मकईत जवळ जवळ ३० कॅलरी असतात. मकईत असलेल्या फायबरमुळे वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी नाष्ट्याला हा हल्का आहार घेतल्यास वजन कमी होते. यासाठी अट एकच आहे हे पॉपकॉर्न घरच्या घरी बनवलेले असावेत तरच त्याचा फायदा होईल. 

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी