Weight Loss Diet Chart in Marathi: भारतात राजमा चावल मोठ्या प्रमाणात वापरला जातो, असे म्हटल्यास वावगं ठरले नाही पाहिजे. विशेष रूपाने उत्तर भारतात हा पदार्थ रोजच्या आहारातही आढळतो. तुमच्यापैकी बरेच वाचक राजमा चावलचे कट्टर समर्थकही असतील. तर मित्रांनो जर तुम्ही राजमा चावल खात असाल तर खूप छान आहे. कारण फारच कमी लोकांना माहीत आहे की, हा एक उपयुक्त खाद्यपदार्थ आहे. राजमा भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
खास करून जर तुम्ही वजन लवकर कमी करायचा विचार करत असाल तर राजमा चावलचे सेवन योग्य असू शकते. देशातील सुप्रसिद्ध आहारतज्ञ मॅक सिंग म्हणतात की, भात किंवा राजमा वजन वाढवणारे आहेत असे अनेकांना वाटते. पण तसे नाही. तसेच जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही कुठलीच किरकीर न करता राजमा चावल खाऊ शकता.
मॅकच्या मते, हे भारतीय अन्न आहारातील फायबर, प्रथिने आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. राजमा भात नियमित खाल्ल्याने तुमचे वजन कमी होतेच, शिवाय रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. तरीही विश्वास बसत नसेल तर हा लेख पूर्ण वाचा-
राजमा चावल फायबरचा खूप चांगला स्रोत आहे. हे विद्रव्य फायबरने भरपूर असते त्यामुळे राजमा चावल खाल्याने तुमचे पोट काही तासांसाठी भरलेले राहते आणि तुम्हाला भूक किंवा दुसरं काही खाण्याची इच्छा होत नाही. या व्यतिरिक्त, हे तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. म्हणूनच राजमा चावलच सेवन करावे, म्हणजे तुम्हाला हे फायदे मिळतील.
राजमाची वनस्पती प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, प्रोटीन पोट भरण्यात आणि भूकला कमी करण्याच्या रूपात काम करते. राजमा चावलची चव आणि ताकद वाढवण्यासाठी दह्यासोबतही खाऊ शकतात. राजमा आणि चावलामध्ये नऊ आवश्यक अमिनो एसिड असतात. जे शरीराच्या कामकाजासाठी खूप महत्वाचे आहे. याच कारणामुळे तज्ज्ञ आहारात राजमा चावलचा समावेश करण्याची शिफारस करतात.
राजमामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे (24). पण रूग्णांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सफेद भात जीआई जास्त असते, पण राजमा चावलमध्ये राजम्याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते आणि हे आपल्या शरीराला फायदे देऊ शकते. कमी असलेल्या ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ खाल्याने वजन कमी करण्यात मदत मिळते. त्यामुळे मधुमेहींसाठी वजन कमी करण्याच्या प्रवासात राजमा चावल हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
राजमा चावल एक हलकं जेवण आहे आणि काही लोकांचे आवडत जेवण ही, त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमची आवडती कोणतीही गोष्ट खाता, तर चांगले कंपन आणि आनंदी हार्मोन्स सोडले जातात, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारात राजमा चावलचे आवश्य समाविष्ट करा.
राजमा पोटॅशियमचा पण चांगला स्रोत आहे फक्त १०० ग्राम राजमा ते ४०५ मिलीग्राम पोटॅशियम मिळते. या व्यतिरिक्त, राजमा चावल शरीरातल्या पाण्याचा वजनाला कमी करण्यात मदत करतात आणि हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी राजमा चावल पण एक उत्तम निरोगी अन्न सिद्ध झाले आहे. तुम्ही असा विचार केला होता का, की ह्या मसालेदार डिशचे एवढे फायदे आहेत ? तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.