Weight Loss Drinks : सध्याच्या काळात लठ्ठपणा ही मोठी समस्या आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारानां निमंत्रण मिळतं. अशा वेळी वजन कमी करणं फार कठीण होऊन जातं. परंतु व्यायाम आणि योग्य आहारामुळे वजन लवकर कमी होतं. वजन कमी करण्यासाठी एखादे ड्रिंक म्हणजेच पेय फार महत्त्वाचे असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नियमितपणे रिकाम्या पोटी एखादे पेय घेतल्यास वजन नक्की कमी होईल. या आरोग्यदायी पेयामुळे शरीराचे वजन लवकर कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी जिर्याचे पाणी फायदेशीर ठरतं. जिर्यामुळे आपली पचनशक्ती वाढते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला शरीरातील फॅट कमी करायचे असेल तर नियमितपणे जिर्याचे पाणी प्या. यासाठी दररोज रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरा टाकून ठेवा. सकाळी हे रिकाम्या पोटी हे पाणी प्या त्यामुळे नक्की वजन कमी होईल.
वजन कमी करण्यासाठी धन्याचे पाणीही फायदेशीर ठरतं. धन्याच्या पाण्यामुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. धन्याचे पाणी प्यायल्यास शरीर डीटॉक्स होते. हे ड्रिंक तयार करण्यासाठी एक चमचा धने पाण्यात रात्रभर भिजून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे पाणीही फायदेशीर आहे असे जाणकार सांगतात. दालचीनीच्या पाण्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढते आणि त्यामुळे वजन लवकर कमी होतं. हे पेय बनवण्यासाठी एका ग्लासात दालचिनीचा एक तुकडा टाकून ते पाणी गरम करा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. यामुळे लवकर वजन कमी होईल.