Weight Loss Story: 90 किलोच्या न्यूट्रिशनिस्टने केली कमाल, असं कमी केलं 30 किलो वजन

स्वतः आहारतज्ज्ञ असल्यामुळेे इतरांना त्या संतुलित आहाराबाबत सल्ले देत होत्या. मात्र त्यांचं स्वतःचं वजन मात्र वाढलं होतं. त्यामुळे त्यांना मनातून वाईट वाटत होतं. आपण फिट नसताना इतरांना सल्ला देणं योग्य नाही, असे विचार त्यांच्या मनात येत होते.

Weight Loss Story
90 किलोच्या न्यूट्रिशनिस्टने घटवलं 30 किलो वजन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आहारतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. करीना यांनी कमी केलं तब्बल 30 किलो वजन
  • स्वतःसाठी प्लॅन केला डाएट आणि सुरु केला व्यायाम
  • सहा महिन्यात झाला डॉ. करीना यांचा कायापालट

Weight Loss Story: वाढलेलं वजन कमी (Weight Loss) करणं, हे सर्वात आव्हानात्मक काम मानलं जातं. गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या डॉ. करीना पांड्या (Dr. Kareena Pandya) यांनी हे अवघड काम लिलया करून दाखवलं आहे. स्वतः होमिओपथी डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ असणाऱ्या करीना यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलं होतं. त्यांचं वजन 90 च्या घरात पोहोचलं होतं. स्वतः आहारतज्ज्ञ असल्यामुळेे इतरांना त्या संतुलित आहाराबाबत सल्ले देत होत्या. मात्र त्यांचं स्वतःचं वजन मात्र वाढलं होतं. त्यामुळे त्यांना मनातून वाईट वाटत होतं. आपण फिट नसताना इतरांना सल्ला देणं योग्य नाही, असे विचार त्यांच्या मनात येत होते. त्यावर उपाय करण्याचा निर्धार त्यांनी आपल्या मनाशी केला आणि आपलं वजन कमी करण्याचा चंग बांधला. त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत त्यांनी तब्बल 30 किलो वजन कमी केलं.

असा होता डाएट

आहारतज्ज्ञ असल्यामुळे वजन कमी कऱण्याच्या प्रवासाची सुरुवात त्यांनी डाएटमध्ये बदल करण्यापासून केली. त्यांनी स्वतःसाठी एक डाएट प्लॅन तयार केला आणि तो फॉलो केला. असं होतं त्यांचं डाएट. 

१. नाश्ता

मोड आलेली कडधान्यं, पोहे, पनीर, व्हेज उपमा यापैकी काहीतरी

अधिक वाचा - When to apply nail polish: मुलांना ‘या’ वयापर्यंत अजिबात लावू नका नेल पॉलिश, होऊ शकतात गंभीर आजार

२. दुपारचं जेवण

हिरव्या भाज्यांसोबत बाजरीची भाकरी, एक कप वरण, अर्धी वाटी भात, एक प्लेट सॅलड आणि दही. या सर्वांच्या एकूण कॅलरी 500. 

३. रात्रीचे जेवण

शाकाहारी दलिया, छोले टिक्की, फ्रँकी, टोफू सँडविच

४. फ्री वर्कआऊट मिल

मूठभर ड्रायफ्रूट्स

५. चिट मिल

कुठलाही आवडता पदार्थ खाणं सोडलं नाही. 

६. व्यायामानंतरचा आहार

प्रोटिन स्मुदी किंवा पीनट बटर टोस्ट

अधिक वाचा - Sleep Hygiene: स्लीप हायजीन म्हणजे काय रे भाऊ? कसा कमी होतो तणाव?

७. लो-कॅलरी रेसिपी

मखाना चॅट, मसाला सोया चंक्स, काकडी-कॉर्न सॅलड, कॉर्न पीनट चाट, ॲपल चाट, गाजर, मोड आलेली कडधान्ये. 

व्यायामाचे नियोजन

आपल्या व्यायामाविषयी डॉ. करीना भरभरून बोलतात. त्यांनी सर्व प्रकारच्या व्यायामांचा आपल्या शेड्युलमध्ये समावेश होईल, याची दक्षता घेतली होती. कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग असे व्यायाम विशेषत्वाने त्यांनी केले. आठवड्यातून एक दिवस योगा आणि एक दिवस झुंबा डान्स त्या करत असत. दिवसभर सक्रीय राहणे हा फिट राहण्याचा मंत्र असल्याचं त्यांच्या या काळात लक्षात आलं. आपल्या नियमित व्यायामाव्यतिरिक्त दिवसभर त्या काही ना काही करत असतं. 

अशी मिळाली प्रेरणा

मी स्वतःच फिट नसेन, तर इतरांना फिटनेसचा सल्ला देण्याचा नैतिक अधिकार माझ्यापाशी असणार नाही, असा विचार त्यांनी केला आणि वजन कमी करायला सुरुवात केली. वर उल्लेख केलेला डाएट आणि व्यायाम यांच्या मदतीने केवळ 6 महिन्यांत त्यांचा कायापालट झाला आणि 90 किलो असणारं वजन 60 किलोवर आलं. डॉ. करीना या आता अनेकांसाठी प्रेरणास्थान आणि रोल मॉडेल ठरल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी