Weight Loss Soup: वजन कमी करायचंय? ‘हे’ तीन सूप प्या, जाणून घ्या बनविण्याची पद्धत आणि फायदे

तब्येत पाणी
Updated Feb 06, 2020 | 13:33 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Weight reducing soup: सूप आणि वजन कमी करणं म्हणजे यात मैत्रीचं नातं आहे, असं म्हणता येईल. काही सूप वेट लॉससाठी फायदेशीर ठरतात आणि त्याची चव सुद्धा जबरदस्त असते. जाणून घ्या कसं बनवायचं सूप...

weight reducing soup
वजन कमी करायचंय? ‘हे’ तीन सूप प्या,जाणून घ्या कसं बनवायचं ते  |  फोटो सौजन्य: Instagram

घरात आपण जे सूप बनवतो ते फक्त पौष्टिकच नाही तर यात कार्ब्सचं प्रमाणही नसतं. मात्र बाजारात किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या सुपामध्ये कृत्रिम एसेंस आणि फ्रोजन भाज्या टाकल्या जातात. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात कॉर्न स्टार्च सुद्धा असतं. त्यामुळे असं सूप फक्त चवीला छान असतात पण आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत. तसंच असं सूप प्यायल्यानं वजन सुद्धा वाढतं. त्यामुळे जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर सूप घरात बनवलेलंच प्यावं. असे तीन सूप आहेत जे आपण घरात सहजपणे बनवू शकता. घरात केलेलं सूप प्यायल्यानं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि वजन सुद्धा कमी होतं.

सूपसाठी या भाज्यांची करा निवड

सूप बनविण्यासाठी अशा भाज्या निवडाव्यात ज्यात फायबर अधिक असतं. जशा की ब्रोकोली, गाजर, टोमॅटो, बीट सारख्या कुठल्याही भाज्या आपण घेऊ शकता. कारण भाज्यांमध्ये आरोग्यासाठी उत्तम असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. गाजरामध्ये कॅलरी कमी असतात, तर टोमॅटो व्हिटॅमिन सीनं परिपूर्ण असतात आणि ब्रोकोलीमध्ये फायटो केमिकल्स असतात, या सर्व पदार्थांमुळे वजन कमी करण्यात मदत मिळते.

१. ब्रोकोली-गाजर सूप

या सूपमध्ये कॅलरी तर खूप कमी असतात पण व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि रफासे खूप मिळतात. हे सूप प्यायल्यानंतर पोट खूप काळापर्यंत भरलेलं आहे असं वाटतं. यामुळे वजन आणि साखर दोन्ही कंट्रोलमध्ये राहतात.

असं बनवायचं ब्रोकोली-गाजर सूप

१ कप ब्रोकोली, १ कप गाजर, १ कप हिरवे मटार, १ कप शिमला मिर्ची आणि १ कांद्यासोबत ६ लसणाच्या पाकळ्या, ३ लवंग, ६ मिरे आणि चवीनुसार मीठ टाकावं. आता एक पॅन घ्या आणि मोठ्या चमच्यानं तेल घालून ते गरम करा. आता लसूण आणि कांदा तेलात भाजून घ्या आणि सर्व भाज्यांना पाच मिनीटं शिजू द्या. आता त्यात पाणी घाला आणि मिश्रण उकळू द्या. पॅनला कव्हर करून मिश्रणाला १० मिनीटं मध्यम आचेवर उकळू द्या. आपल्या स्वादानुसार मीठ आणि मिरेपुड घालून गरम गरम सूप पिण्यासाठी सर्व्ह करा.

२. मशरूम सूप

मशरूम खूप चविष्ट असतात त्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात. ग्लुकोज नियमित करणं आणि फॅट बर्न करण्याचं काम ते करतं. मशरूम प्रोटीन्सनं परिपूर्ण असतात आणि यामुळे मेटॅबॉलिझम वाढतं. त्यामुळेच वजन झपाट्यानं कमी होतं.

मशरूम सूप बनविण्याची पद्धत

१ कप कापलेलं मशरूम, अर्धा कप उकळलेले कॉर्नचे दाणे, १ चिरलेला कांदा, ३ लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, १ कप दूध, चवीनुसार मिरे पुड आणि २ कप पाणी. आता एका पॅनमध्ये कापलेलं मशरूम तेलात भाजून घ्या. जेव्हा त्याचा रंग जरासा बदलेल तेव्हा यात उकळलेले कॉर्नचे दाणे आणि दुध घाला. यानंतर गॅसवरून हे पॅन काढा आणि ते मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून काढा. आता एका पॅनमध्ये कांदा आणि लसून भाजून घ्या आणि त्यात मिक्सरमधून काढलेली पेस्ट टाका. तीन मिनीटांपर्यंत हे सूप उकळू द्या. जेव्हा सूप चांगलं उकळेल तेव्हा ते गरम-गरम सूप सर्व्ह करा.

३. फुलकोबीचं सूप

फुलकोबी सर्वात पौष्टिक आणि सहजपणे उपलब्ध होणारी भाजी आहे. १०० ग्राम फुलकोबीत फक्त २५ कॅलरीज असतात. वजन कमी करायचा असेल तर हे सूप त्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. यामुळे भूख नियंत्रणात राहते.

बनविण्याची पद्धत

१०-१२ फुलकोबीचे फुल, १ चिरेलला कांदा, २ लहान चिरलेले बटाटे, ऑलिव्ह ऑईल, लसणाच्या ५ पाकळ्या, क्रीम आणि व्हेजिटेबल स्टॉक. आता एका पॅनमध्ये लसूण आणि कांदा भाजून घ्या. आता यात बटाटा, कोबी आणि व्हेजिटेबल स्टॉक टाकावं आणि सूप उकळू द्यावं. आता सूप थोडं घट्ट होईल आणि गॅसवरून ते खाली उतरवा आणि गरम-गरम पिण्यासाठी सर्व्ह करा. आपल्याला हवं असेल तर त्यात मुसळी पण टाकू शकता. यामुळे रफासेचं प्रमाण वाढतं आणि चव सुद्धा वाढते. पोट सुद्धा खूप काळापर्यंत भरलेलं जाणवतं.

तर मग हे तीन सूप आपण आलटून-पालटून आपल्या डाएटमध्ये सामिल करून घ्या. प्रयत्न करा की, रात्रीच्या वेळी हेच सूप प्या जेणेकरून अधिकच्या कॅलरीपासून आपण दूर राहाल आणि वजन कमी होण्यात फायदा होईल.

डिस्क्लेमर: वरील बातमीत दिलेल्या टिप्स या फक्त सामान्य माहितीच्या आधारे दिल्या गेल्या आहेत. याचा वापर करण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी