Weight Loss Tips : वजन घटविण्यासाठी उपयुक्त असलेला मसाला आणि तो वापरण्याच्या ४ पद्धती

weight loss tips ajwain celery burning belly fat fenugreek kalonji water fennel obesity : झटपट वजन घटविण्यासाठी ओवा अर्थात अजवाइन हा मसाला उपयुक्त आहे.

weight loss tips ajwain celery burning belly fat fenugreek kalonji water fennel obesity
Weight Loss Tips : वजन घटविण्यासाठी उपयुक्त असलेला मसाला आणि तो वापरण्याच्या ४ पद्धती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Weight Loss Tips : वजन घटविण्यासाठी उपयुक्त असलेला मसाला आणि तो वापरण्याच्या ४ पद्धती
  • आयुर्वेदात वजन घटविण्यासाठी ओवा या मसाल्याचा उल्लेख आढळतो
  • ओवा हा मसाला पचनाची क्षमता वाढविण्यासाठी तसेच पोट साफ राहावे याकरिता रेचकाच्या स्वरुपातही उपयुक्त

weight loss tips ajwain celery burning belly fat fenugreek kalonji water fennel obesity : झटपट वजन घटविण्यासाठी ओवा अर्थात अजवाइन हा मसाला उपयुक्त आहे. आजच्या फास्ट फूड आणि जंक फूडच्या काळात लठ्ठपणाची गंभीर समस्या ओवा सहजतेने दूर करण्यास मदत करतो. यामुळेच आयुर्वेदात वजन घटविण्यासाठी ओवा या मसाल्याचा उल्लेख आढळतो. ओवा हा मसाला पचनाची क्षमता वाढविण्यासाठी तसेच पोट साफ राहावे याकरिता रेचकाच्या स्वरुपातही उपयुक्त आहे. 

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी ओवा या मस्ल्याचा वापर करावा. वजन कमी करण्यासाठी ओवा हा मसाला वापरण्याच्या चार प्रभावी पद्धती....

  1. मेथी दाणे, नायजेला (कलौंजी) आणि ओवा : मुठभर मेथी दाणे, ओवा आणि नायजेला (कलौंजी) उन्हात सुकवून नंतर भाजून घ्या. या सर्व घटकांना एकत्र करुन मिक्सरमध्ये फिरवून त्याची पूड करा. ही पूड हवाबंद बाटलीत ठेवा. दररोज रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि या पाण्यात ही पूड एक चमचा टाकून ढवळून प्या. वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल. 
  2. पाणी आणि ओवा : एक चमचा उन्हात सुकवलेला ओवा एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. हे मिश्रण दररोज सकाळी घ्या. वजन कमी होण्यास मदत होईल.
  3. मध आणि ओवा : २५० मिली पाण्यात २५ ग्रॅम उन्हात सुकविलेला ओवा मिसळा. हे मिश्रण रात्रभर    तसेच ठेवून द्या. सकाळी मिश्रण गाळून घ्या. गाळणीत राहिलेला ओवा एक चमचा मधात मिसळून त्याचे सेवन करा. दररोज हा प्रयोग केल्यास तीन महिन्यात वजन कमी झाल्याचे दिसून येईल. 
  4. बडीशेप आणि ओवा : एक चमचा बडीशेप आणि एक चमचा उन्हात सुकविलेला ओवा एकत्र करुन हे मिश्रण चार कप पाण्यात उकळवा. रंग बदलताच मिश्रण गाळून घ्या. गाळणीत राहिलेली बडीशेप आणि ओवा चावून खा. वजन कमी होण्यास मदत होईल. 

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी