Weight Loss Tips: आलं- लिंबाचा ज्यूस वजन कमी करण्यास उपयुक्त

तब्येत पाणी
Updated Mar 25, 2019 | 11:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

lemon-ginger Juice: जर का तुम्हांला तुमच्या पोटाचा घेर कमी करण्यासोबतच वेट लॉसचा प्रोग्राम आणखीन वेगवाग करायचा असले तर आलं आणि लिंबाच्या रसाशिवाय दुसरा कोणताच बेस्ट उपाय होऊ शकत नाही.

Lemon Ginger Juice
Weight Loss Tips: आलं- लिंबाचा ज्यूस वजन कमी करण्यास उपयुक्त  |  फोटो सौजन्य: Thinkstock

Health benefit Of Lemon-ginger juice: वजन कमी करण्यासाठी आलं आणि लिंबाचं पाणी पिणं हे सरवांत बेस्ट ऑप्शन आहे. लिंबात असलेल्या व्हिटामिन सी हे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर आलं एकत्र केल्यास त्याचं वजन कमी करण्याची शक्ती आणि क्षमता आणखीन वाढते. आलं आणि लिंबू जेव्हा एकत्र करून पितो तेव्हा त्यात असलेले न्यूट्रिएंट्स आपलं शरीर चांगल्या पद्धतीनं अब्सोर्ब करतं. 

लिंबूमध्ये व्हिटामिन सी, बी६, पॉलिफेनॉल, टेरपीन, नॅरिंगिन, हिस्पेरिडन, पोटॅशिअम, आर्यन, मॅग्निशियम, कॅल्शियम आणि फायबर असते तर आल्यात आवश्यक तेल, बिसाबोलिन, जिंजरोल यासारखे न्यूट्रिएंट असतात. या सर्व न्यूट्रिएंट्समुळे वजन कमी करण्यासह अनेक फायदे देखील आहे. तर जाणून घेऊया आलं आणि लिंबाचा ज्यूस कसा बनवायचे आणि त्याचे फायदे. 

वजन कमी करणे: आलं आणि लिंबू हे दोन्ही वजन कमी करण्यासाठी सर्वांत चांगलं आणि नैसर्गिक घरगुती उपाय आहे. जे पुरूष सकाळी नाश्ता खाल्यानंतर आल्याचं पाणी पितात त्यांच्यात सेटिस्टफेक्शन लेवल अधिक असते, अशी माहिती एका रिसार्चमधून समोर आली आहे. यामुळे लोकांना वजन कमी करण्यासाठी मदत होते. लिंबात असलेल्या पॉलिफेनोल एंटिऑक्सिडेंट लठ्ठपणा कमी करण्याचं काम करते. 

जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित २००५ मध्ये उंदीरावर हा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला होता. लिंबाच्या रसात व्हिटामिन सी आपल्या शरीरातील जास्त प्रमाणात असलेली चरबी जाळण्यासाठी मदत करते. विशेष करून जेव्हा तुम्ही एक्सरसाईज करत असता. पुरेसे व्हिटामिन सी प्राप्त केल्यानं वर्कआऊटच्या दरम्यान शरीरातील चरबी कमी करण्यासाठी ३० टक्क्यांनी वाढ होते. 

इम्यून सिस्टम मजबूत होण्यात मदत 

आलं लिंबाचं पाणी इम्यून सिस्टम चांगलं करण्यासाठी खूप चांगलं काम करतं. इम्यून सिस्टम आपल्या शरीराला रोगांपासून लढण्यासाठी शक्ती देतं. तसेच शरीराला अॅक्टिव्ह बनवण्यासाठी ही फायेदशीर आहे. आलं लिंबाच्या पाण्यात एंन्टीऑक्सिडेंट असतं आणि रोग निर्माण करणारं फ्री रेडिकल आणि बॅक्टेरियाशी लढण्यासाठी सक्षम होतं. 

डायजेशन आणि पोटाच्या आजारासाठी प्रभावी 

जर का तुमच्या डायजेशनमध्ये गडबड, पोटदुखी किंवा मळमळ होत असेल तर आलं-लिंबाचा रस खूप फायदेशीर आहे. याचा ज्यूस प्यायल्यास लगेच त्याचा परिणाम दिसून येतो. त्यासोबतच स्किन देखील हेल्थी करण्याचं काम करते. 

मायग्रेन दूर करण्यास मदत 

आलं- लिंबाचं पाणी प्यायल्यास मायग्रेन आणि डोकेदुखीची समस्या दूर होते. याचे पाणी रोज पिण्याचे देखील खूप फायदे आहेत आणि त्यासोबतच मायग्रेन असेल तर याचा ज्यूस जरूर प्यावा. 

ब्लड शुगर व्यवस्थित 

आल्यामध्ये डायबिटीजशी लढण्याचा गुण आहे. हा टाइप २ डायबिटीज असलेल्या रूग्णांवर खूप काम करतं. रोज २ ग्राम आल्याचा ज्यूस प्यायल्यानं शरीरातली ब्लड शुगरचा स्तर कमी होतो. तसंच हृदयविकाराच्या रूग्णांसाठी देखील हे बर्याच मार्गांनी खूप फायदेशीर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...