ऋजुता दिवेकरने सांगितले करिनाच्या फिटनेसचे सीक्रेट

Weight Loss Tips डाएटिशिअन ऋजुता दिवेकरने अभिनेत्री करिना कपूर खान हिच्या फिटनेसचे सीक्रेट सांगितले

Weight Loss Tips by kareena kapoors dietician rujuta diwekar to lose weight fast
ऋजुता दिवेकरने सांगितले करिनाच्या फिटनेसचे सीक्रेट 

थोडं पण कामाचं

  • ऋजुता दिवेकरने सांगितले करिनाच्या फिटनेसचे सीक्रेट
  • फिटनेससाठी उपाशी राहू नका पोटभर जेवा - ऋजुता दिवेकर
  • ऋजुता दिवेकरच्या सोप्या डाएट टिप्स

मुंबईः डाएटिशिअन ऋजुता दिवेकरने (Dietician Rujuta Diwekar) अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिच्या फिटनेसचे सीक्रेट (Fitness Secret) सांगितले. फास्ट फूड आणि जंक फूड, आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक तसेच सर्व व्यसने यांच्यापासून चार हात लांब राहा. आपण जिथे राहता तिथे सहज उपलब्ध असलेले ताजे अन्न, ताजी फळे यांचे सेवन करा. अनेक वर्षांपासून भारतात राहता मग बिनधास्त रात्री भात खा, जेवणात खोबरेल तेल वापरा आणि मिठाई ऐवजी ताजी फळे खा. आपण फिटनेस राखू शकता, असे ऋजुता दिवेकरने सांगितले. (Weight Loss Tips by kareena kapoors dietician rujuta diwekar to lose weight fast)

फिटनेससाठी उपाशी राहू नका पोटभर जेवा फक्त कधी कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा याला महत्त्व आहे, असे ऋजुता दिवेकर सांगते. करिनाने सूचनांचे पालन केले त्यामुळेच ती फिटनेस जपू शकली. बेबो ते झिरो फिगर हा प्रवास करू शकली; अशी माहिती ऋजुता दिवेकर यांनी दिली. भारतात जाडेपणा ही एक गंभीर समस्या झाली आहे. अनेकजण वजन कमी करू इच्छितात, फिटनेस राखू इच्छितात. करिना प्रमाणे फिट अँड फाइन राहण्याची अनेकांना इच्छा आहे. पण हे करायचे कसे याविषयी मनात असंख्य प्रश्न आहे. या प्रश्नांप्रमाणेच काही गैरसमजही आहेत. जसे करिनाच्या मनातल्या शंका दूर करुन तिला फिटनेस राखण्यासाठी सूचना केल्या अगदी तसेच इतरांनीही मनातले प्रश्न आणि गैरसमज दूर केले तर ते फिट अँड फाइन राहू शकतात, असे ऋजुता दिवेकर म्हणाल्या.

करिनाने फिटनेस जपण्यासाठी भारतीय खानपान संस्कृतीचे पालन केले. त्यामुळे फिटनेस जपण्यासाठी उपाशी राहिले पाहिजे किटो डाएट, अमूक दिवसांचे डाएट, सॅलड डाएट असले पाश्चात्य प्रकार करण्यापेक्षा आपल्या वातावरणात जे सहज शक्य आहे असेच डाएट करण्याचा सल्ला ऋजुता दिवेकर देतात. त्यांनी करिना प्रमाणेच फिट अँड फाइन राहण्यासाठी भारतीय नागरिकांना काही डाएट टिप्स दिल्या.

डाएट टिप्स

  1. तेलबियांचे अस्सल तेल - मोहरीचे तेल, शेंगदाण्याचे तेल, खोबरेल तेल (नारळाचे तेल) यापैकी एखाद्या तेलाचा वापर पदार्थ तयार करण्यासाठी करावा.
  2. नारळ पचायला हलका - नारळ पचायला हलका आहे. याच कारणामुळे नारळाचे तेल स्वयंपाक करण्यासाठी वापरा. खोबरं वापरुन केलेली चटणी आणि पदार्थ सजवण्यासाठी अथवा त्याची चव सुधारण्यासाठी केलेला खोबऱ्याचा वापर लाभदायी आहे. नारळापासून तयार केलेल्या मिठायांमध्ये साखर घातली असेल तर ही मिठाई खाणे टाळा अथवा मिठाई मर्यादीत प्रमाणात खा.
  3. लाभदायी काजू - काजूमध्ये मिनरल्स, अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन आणि शरीरासाठी लाभदायी फॅट आहे. काजू खाल्ल्यामुळे शरीरात सेरोटोनिन हार्मोन तयार होते. पुरेशी झोप येण्यासाठी तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी पुरेश्या प्रमाणात शरीरात सेरोटोनिन हार्मोन तयार होणे आवश्यक आहे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दूध आणि मोजकेच काजू असा आहार घ्यायला हरकत नाही.
  4. लोखंडाच्या कढईत स्वयंपाक करा - लोखंडाच्या कढईत तयार केलेले जेवण जेवणे लाभदायी आहे. यातून शरीरात आयर्न जाते. फक्त ही कढई व्यवस्थित वापरा.
  5. सकाळी उठल्यावर वीस मिनिटांच्या आत खाऊन घ्या - सकाळी उठल्यावर झटपट फ्रेश व्हा आणि फळे खा. लक्षात ठेवा सकाळी उठल्यापासून वीस मिनिटांच्या आत ताजी फळे आणि सुकामेवा यांचे सेवन लाभदायी आहे. दिवसाची सुरुवात केळे खाऊन करता येईल. केळे नसल्यास दुसरे एखादे ताजे फळ खा. पाण्यात रात्रभर भिजत घातलेले बदाम चावून खा. नंतर पोटभर पाणी प्या. यानंतर आवरुन घेऊन पोटभर नाश्ता करा. 
  6. संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान रात्रीचे जेवण जेवून घ्या - सकाळी शरीरात मोठ्या प्रमाणात असलेले कार्टिसोल हार्मोन संध्याकाळी कमी होत जाते. ही बाब लक्षात ठेवा. रात्रीचे जेवण संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान जेवून घ्या. 
  7. रात्रीच्या जेवणात भात अथवा भाताची खिचडी - रात्रीच्या जेवणात हातसडीचा तांदूळ वापरा. या तांदळाचा भात अथवा भाताची खिचडी खायला हरकत नाही. भात किंवा भाताची खिचडी जेवणार असल्यास त्यावर एक चमचा साजूक तुप घ्या. रात्रीचे जेवण संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान झाले असेल तर इतर आवश्यक कामं आटोपून रात्री ९ पर्यंत झोपा. जागरण टाळा. लक्षात ठेवा हातसडीचा तांदूळ पचायला हलका असतो. या तांदळाचे सेवन शरीराची लवचिकता वाढवण्यास मदत करते. रात्री शांत झोप लागते. थकवा दूर होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी