Weight Loss Tips: रिकाम्यापोटी या ३ गोष्टींचे करा सेवन, झपाट्याने कमी होईल वजन

तब्येत पाणी
Updated Apr 26, 2022 | 11:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Tips । वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घेणे खूप गरजेचे आहे. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो त्यामुळे ते त्यांच्या योग्य आहारावर देखील लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

If you consume these 3 things on an empty stomach, you will lose weight fast
उपाशीपोटी या ३ गोष्टींचे सेवन केल्यास झपाट्याने कमी होईल वजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घेणे खूप गरजेचे आहे.
  • बडीशेप, धणे आणि जिरे यांपासून वजन कमी केले जाऊ शकते.
  • गर्मीच्या दिवसात शरीराला गारवा पोहचण्यासाठी बडीशेप खूप फायदेमंद मानली जाते.

Weight Loss Tips । मुंबई : वजन कमी करण्यासाठी (Wight Loss) व्यायाम आणि योग्य आहार (Diet) घेणे खूप गरजेचे आहे. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो त्यामुळे ते त्यांच्या योग्य आहारावर देखील लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा स्थितीत आपण नैसर्गिक पद्धतीने आपले वजन कमी करू शकतो. त्यामध्ये बडीशेप, जिरे, कोथिंबीरचे पाणी, (Cumin Fennel And Coriander Seed Water) या ३ गोष्टींचे सेवन केल्याने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होण्यास सुरूवात होते. चला तर म जाणून घेऊया या तीन गोष्टींचे फायदे. (If you consume these 3 things on an empty stomach, you will lose weight fast). 

असे तयार करा डिटॉक्स वॉटर 

बडीशेप, धणे आणि जिरे यांपासून डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही अर्धा-अर्धा चमचा धणे, जिरे आणि बडीशेपला एका ग्लासमध्ये पाणी टाकून भिजवा आणि त्याला रात्रभर असेच ठेवा. सकाळी चांगले उकळून घ्या आणि गाळून कोमट झाल्यावर उपाशीपोटी त्याचे सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चिमूटभर मीठ आणि लिंबाचा रस देखील घालू शकता. हे तुमचे शरीर डिटॉक्स करण्यासाठी कार्य करेल आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून चरबी झपाट्याने कमी करण्यात मदत करेल.

अधिक वाचा : जो बायडन यांना इलॉन मस्क यांची भीती, वाचा सविस्तर

जिऱ्याचे फायदे

जवळपास सर्वच भाज्यांमध्ये वापरले जाणारे जिरे खरं तर आपली चयापचय आणि पचनक्रिया नियंत्रणात ठेवते. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात हे खूप फायदेमंद असते आणि शरीरातील डिटॉक्स कमी करण्यासाठी काम करत असते. यामध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, तांबे यांसारखे अनेक पोषक तत्वे आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच बॅक्टेरियाशी लढते.

बडीशेपचे फायदे 

गर्मीच्या दिवसात शरीराला गारवा पोहचण्यासाठी बडीशेप खूप फायदेमंद मानली जाते. सोबतच आपल्या पचनक्रियेला देखील मजबूत करते आणि चयापचय देखील वाढवते. एका रिसर्चनुसार रोज बडीशेप खाल्ल्याने आपले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. तसेच आपल्याला हृदय आणि कॅन्सर संबंधित समस्या उद्भवत नाही.

कोथिंबीरचे फायदे

कोथिंबीरचे बी वजन कमी करण्यासाठी खूप फलदायी असते. हे बी शरीरातील दुर्गंधी कमी करण्यासाठी काम करते असे बोलले जाते. यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते. याशिवाय त्वचेसाठी देखील फायदेमंद असते. असे बोलले जाते की कोंथिबीरचे पाणी पिल्याने त्वचेवर चमक येते आणि पोट पण साफ राहते. 

जिरे, धणे आणि बडीशेप चहाचे फायदे

चांगले पचन - या रेसिपीमध्ये वापरलेले सर्व मसाले चांगल्या पचन क्रियेशी संबंधित आहेत आणि ते कार्मिनिटिव्ह आहेत.
चरबी कमी करते - काही अभ्यासानुसार, ही चहा फॅट कमी करण्यासाठी मदत करू शकते आणि चरबी कमी करते. 
दुधाच्या उत्पादनात वाढ - नर्सिंग मातांना दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी एका जातीची बडीशेप आणि जिरे यांची शिफारस केली जाते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी