Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी प्या ओव्याचे पाणी, वाढत्या चरबीवर लागेल फुल स्टॉप

तब्येत पाणी
Updated Mar 17, 2023 | 19:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Tricks: जर तुम्ही कंबरेभोवतीच्या वाढत्या चरबीमुळे वैतागला असाल आणि अनेक प्रयत्न करूनही तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकत नसाल तर सकाळी दुधाचा चहा सोडून ओव्याचे पाणी प्या, तुम्हाला काही दिवसातच रिझल्ट मिळेल.

Weight Loss Tips
सकाळी रिकाम्या पोटी प्या ओव्याचे पाणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ओवा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतो.
  • ओवा घसा स्वच्छ ठेवण्यासाठी गुणकारी उपाय
  • ओव्याचा काढा तयार करा

Weight Loss Tips: जर तुम्ही कंबरेभोवतीच्या वाढत्या चरबीमुळे वैतागला असाल आणि अनेक प्रयत्न करूनही तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकत नसाल तर सकाळी दुधाचा चहा सोडून ओव्याचे पाणी प्या, तुम्हाला काही दिवसातच रिझल्ट मिळेल.

बायोमेड रिसर्च इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ओवा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते. मुळात ओवा शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल नियंत्रित करतो. यामुळे लठ्ठपणा आणि त्यातून उद्भवणाऱ्या मधुमेह आणि हृदयाच्या समस्या कमी होऊ शकतात. तुमच्या हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहू शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असालं तर रोज ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. 

अधिक वाचा: Papaya Benefits in Summer: उन्हाळ्यात पपई खाणे किती सुरक्षित? जाणून घ्या या ऋतूमध्ये पपई खाण्याचे काय आहेत फायदे

अनेक वेळा मुलांना पोटात दुखते. कधी कधी रात्री उशिराही असे प्रसंग घडतात. अशावेळी मुलांना ओव्याचे पाणी दिल्यास त्यांच्या पोटाला आराम मिळू शकतो. 

ओवा हा फुफ्फुस आणि घसा स्वच्छ ठेवण्यासाठी गुणकारी उपाय आहे. दमा असलेल्या लोकांसाठी ओवा अधिक उपयुक्त ठरू शकतो. ज्या लोकांना श्वसनाची समस्या आहे त्यांनी रोज सकाळी ओव्याचे पाणी प्यावे.

ओव्यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीमाइक्रोबियल आणि अँटीपॅरासायटिक गुणधर्म देखील आढळून येतात. यामुळे खोकला, सर्दी, कान किंवा तोंडाच्या संसर्गापासून तु्म्हाला आराम मिळू शकतो. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत हे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. यावर उपाय म्हणून तुम्ही ओव्याचे पाणी पिऊ शकता.

अधिक वाचा: Oil in Belly Button: रात्री झोपताना नाभीमध्ये टाका 'हे' 4 प्रकारचे तेल, मिळतील अद्भूत फायदे

जर तुम्हाला गॅस्ट्रिकची समस्या असेल आणि तुम्हाला पोटदुखीचा वारंवार त्रास होत असेल तर तुम्ही ओव्याचे पाणी पिले पाहिजे. बायोमेड रिसर्च इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिता, तेव्हा तुमच्या आतड्यातील एन्झाईम सक्रिय होते आणि पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करते.

अधिक वाचा: Summer Drinks in marathi: उन्हाळ्यात नक्की 'हे' 5 पेय, शरीराला देतील थंडावा अन् आजार पळवतील दूर

ओव्याचा काढा तयात करा. हा काढा बनवण्यात मोठे रॉकेट सायन्स नाही. तुम्ही घरी स्वत:हा काढा तयार करू शकता. पाण्यात ओवा उकळून त्यात थोडसे काळे मीठ टाका आणि तो काढा प्या. जर तुम्हाला थोडा चवीष्ट काढा प्यायचा असेल तर तुम्ही त्यात लिंबू, हळद आणि मध घालू शकता. त्यामुळे फ्लेवर्ससोबत त्याचे फायदेही वाढतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी