Weight loss tips : पाच उपायांनी सहज आणि झटपट कमी करा वजन

Weight loss tips, easily reduced weight : निवडक सोप्या टिप्स अंमलात आणून चुकीच्या आहारामुळे वाढलेले वजन झटपट कमी करणे सहज शक्य आहे.

Weight loss tips, easily reduced weight
Weight loss tips : पाच उपायांनी सहज आणि झटपट कमी करा वजन 
थोडं पण कामाचं
  • Weight loss tips : पाच उपायांनी सहज आणि झटपट कमी करा वजन
  • चुकीच्या आहारामुळे वाढलेले वजन झटपट कमी करणे सहज शक्य
  • सहज आणि झटपट वजन कमी करण्यासाठी करायचे पाच उपाय

Weight loss tips, easily reduced weight : उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक शाळा कॉलेजचे विद्यार्थी सुटी असल्यामुळे घरी असतात. याच काळात पालक सुटी घेऊन मुलांसोबत फिरायला जातात. नातलगांच्या भेटीगाठी होतात. सुटीच्या काळात अनेकदा तेलकट पदार्थ, फास्टफूड, जंकफूड खाल्ले जाते. यामुळे वजन वेगाने वाढते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करणे किंवा दररोज चालण्याचा अथवा धावण्याचा व्यायाम करण्याच्या निमित्ताने रपेट मारणे आवश्यक असते. पण पाऊस सुरू झाला तर या गोष्टी नियमितपणे होत नाहीत. पावसाळ्याच्या दिवसांत भजीसारखे तेलकट पदार्थ पुन्हा खाल्ले जातात आणि वजनाची समस्या आणखी गंभीर होत जाते. पण निवडक सोप्या टिप्स अंमलात आणून चुकीच्या आहारामुळे वाढलेले वजन झटपट कमी करणे सहज शक्य आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

सहज आणि झटपट वजन कमी करण्यासाठी करायचे पाच उपाय

  1. नाश्ता : सकाळी नाश्ता करण्याच्या वेळी पोटभर ताजी फळे खा. मर्यादीत प्रमाणात सुका मेवा पण खाऊ शकता. 
  2. हर्बल टी किंवा ग्रीन टी : पुदिना, काकडी, ताज्या भाज्या खा. गरम पाणी प्या. लिंबू रस मिसळून गरम पाणी प्या. हर्बल टी किंवा ग्रीन टी प्या. यामुळे पचनक्षमता सुधारण्यास आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.
  3. ज्युस पिण्याऐवजी ताजी फळे खा : ज्युस पिण्याऐवजी ताजी फळे खा. दररोज सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी जर एक ग्लास दूध पिणार असाल तर ते दूध नाश्ता करण्याच्या किमान अर्धा ते एक तास आधीच प्या.
  4. डीनरनंतर काहीही खाऊ नका : ताज्या भाज्या, सॅलड खा. तेल आणि मीठ यांचा भाज्या तसेच सॅलड मधील वापर मर्यादीत करा. सूर्यास्त होण्याआधी रात्रीचे जेवण म्हणजेच डीनर करून घ्या आणि डीनर झाल्यानंतर दिवस उजाडेपर्यंत काहीही खाऊ नका. 
  5. बंद करा : साखर आणि मैदा तसेच साखरेपासून आणि मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे बंद करा. आईस्क्रीम, शीतपेय, फास्टफूड आणि जंकफूड बंद करणे हिताचे. तेलकट पदार्थ खाणे बंद करा. बेकरीत तयार होणारे पदार्थ खाणे बंद करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी