Weight Loss Tips, Eat Garlic for Weight Loss : अनेकजण हल्ली वाढलेले वजन कसे कमी करावे या चिंतेत असतात. जेवढ्या सहजतेने वजन वाढते तेवढेच ते कमी करणे कठीण होऊन बसते. दीर्घकाळ व्यायाम आणि डाएट करूनही काहींच्या वजनात मर्यादीत घट होते. यामुळे निराश होऊन ते पुन्हा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींकडे वळतात आणि पुन्हा वजन वाढण्यास सुरुवात होते. या सर्व समस्या आता दूर होऊ शकतात. उपाय आहे लसूण. होय दररोज सकाळी लसूण खाऊन झटपट वजन घटविणे सहज शक्य आहे.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या किमान पाच पाकळ्या (कच्च्या लसणाच्या पाच पाकळ्या) व्यवस्थित चावून खाव्या. लसूण खाल्ल्याने वजन कमी करण्यास मोठी मदत मिळते.