Weight loss tips: एक कप आल्याच्या पाण्याने करा दिवसाची सुरूवात, झटपट होईल वजन कमी

तब्येत पाणी
Updated Oct 09, 2020 | 16:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss drink: पोटाची चरबी केवळ दिसायलाच खराब दिसत नाही तर अनेक आजारांचे कारण असू शकते. 

weight loss
एक कप आल्याच्या पाण्याने करा दिवसाची सुरूवात, झटपट होईल वजन  

थोडं पण कामाचं

  • सकाळी रिकाम्या पोटी प्या आल्याचे पाणी कमी होईल एक्स्टॉ फॅट
  • सोप्या पद्धतीने वजन कमी कऱण्यासाठी प्या हे ड्रिंक
  • या वेट लॉस ड्रिंकचे दररोज करा सेवन

मुंबई: शरीराचा लठ्ठपणा(obesity) आणि एक्स्ट्रा फॅट(extra fats) कमी करण्याच्या हजारो टिप्स तुम्हाला इंटरनेटवर सापडतील. मात्र तुम्हाला प्रत्येक टिप्स(weight loss tips) ही तितकीच इफेक्टिव्ह वाटते. पोटाची चरबी(fats on belly) केवळ दिसायला वाईट दिसत नाही तर अनेक आजारांना यामुळे निमंत्रण मिळते. अशातच मेहनत न करता शरीरावरील चरबी कमी करण्याचे उपायही अनेक आहेत. तुम्हाला तर शरीरावर वाढलेले फॅट कमी करायचे आहे अथवा स्लिम बॉडी(slim body) मिळवायची आहे तर आल्याचे पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी योग्य डाएट तसेच नियमित व्यायाम हा गरजेचा असतोच. मात्र त्याचबरोबर आल्याच्या या ड्रिंकने तुम्ही एक्स्ट्रा चरबी कमी करू शकेत. दररोज रिकाम्या पोटी एक कप आल्याचे पाणी प्या. हे वेट लॉस ड्रिंक तुमच्या शरीरावरची एक्स्ट्रा चरबी कमी करण्यास मदत करेल. जाणून घ्या कसे बनवतात आल्याचे पाणी

जेव्हा आपल्याला वारंवार खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही समोर दिसेल ते खाता. अशातच हे खाणे तुमच्या शरीरावर फॅटच्या रूपात दिसू लागते. त्यात जर तुम्ही आल्याचे पाणी प्याल तेव्हा तुम्हाला कमी खाण्याची इच्छा होईल. कारण या पाण्याने पोट भरलेले राहील. आल्याचे पाणी वजन कमी करण्यात फायदेशीर मानले जाते. 

पचनासाठी आले उत्तम

आल्याचे पाणी पचनासाठी उत्तम असते. जर तुम्ही सकाळी उठून आल्याचे पाणी पित आहात तर तुमचा मेटाबॉलिज्म सुधारतो तसेच वजन कमी करण्यासाठी मेटाबॉल्जिमचा वेग वाढणे गरजेचे असते. 

असे बनवा आल्याचे पाणी

  1. एक ग्लास पाणी उकळवा
  2. त्यात अर्धा चमचा किसलेले आले टाका
  3. कमीत कमी दहा मिनिटे आले त्यात उकळून घ्या.
  4. एक कप अथवा ग्लासात हे मिश्रण टाका. 
  5. अधिक चांगल्या स्वादासाठी तुम्ही यात लिंबू अथवा मध टाकू शकता. 

वयस्कर लोकांनी दिवसाला ४ ग्रॅमपेक्षा अधिक आल्याचे सेवन करू नये. तसेच दोन वर्षाखालील मुलांना आले देऊ नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी