Weight Loss Tips | सणासुदीच्या काळात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या खास टिप्स

Weight Loss Tips | सणासुदीच्या काळात मिठाई मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. मात्र या सर्व पदार्थांचा इतका मारा झाल्यावर वजन वाढणे स्वाभाविकच असते. तज्ज्ञ अशावेळी स्थूलपणा आणि मधुमेह याकडे लक्ष देण्यात सांगतात.

Weight Loss Tips
सणासुदीच्या काळात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या खास टिप्स 
थोडं पण कामाचं
  • सणासुदीच्या काळात विविध गोड पदार्थ, फराळ इत्यांदींची रेलचेल
  • मिठाई, स्नॅक्स, फराळ यामुळे जास्तीच्या कॅलरी पोटात जातात
  • सणासुदीच्या काळात वाढणारे वजन नियंत्रणात आणण्यासाठीच्या टिप्स

Weight Loss Tips | नवी दिल्ली: सध्या सणासुदीची धामधूम सुरू आहे. साहजिकच विविध गोड पदार्थ, फराळ इत्यांदींची रेलचेल आहे. हे पदार्थ दिवसभर मनसोक्त खाल्ले जातात. विशेषत: मिठाई मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. मात्र या सर्व पदार्थांचा इतका मारा झाल्यावर वजन वाढणे स्वाभाविकच असते. तज्ज्ञ अशावेळी स्थूलपणा आणि मधुमेह याकडे लक्ष देण्यात सांगतात. विशेषत: ज्यांना आधीच हे दोन त्रास असतील त्यांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित असते. कारण मिठाई, स्नॅक्स, फराळ यामुळे जास्तीच्या कॅलरी पोटात जातात. या कॅलरी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. सणासुदीच्या काळात वाढणारे वजन नियंत्रणात आणण्यासाठीच्या टिप्स पाहूया. (Weight Loss Tips | In Festive season use the tips to control your weight easily)

ग्रीन टी प्या

ग्रीन टीमध्ये फ्लेवोनॉयड्स असते. यामुळे चयापचय वाढते आणि चरबी नियंत्रणात ठेवते आहे. त्यामुळे रोज ग्रीन टी चे सेवन करा. २०१६ मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये छापून आलेल्या एका शोधात असा दावा करण्यात आला होती दिवसाऐवजी रात्री ग्रीन टीचे सेवन केल्यान ३.५ टक्के जास्त कॅलरी खर्च होतात. त्यामुळे तुम्ही दिवसाबरोबरच रात्रीदेखील ग्रीन टीचे सेवन करू शकता.

कोरड्या खोलीत झोपा

एका शोधानुसार कोरड्या खोलीत झोपल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कोरड्या खोलीत झोपल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. यामुळे ७ टक्के कॅलरी खर्च होते. 

वेट लिफ्टिंग करा

वेट लिफ्टिंग हा एक महत्त्वाचा व्यायाम असतो. यामुळे चयापचयाची क्रिया मजबूत होते. शिवाय शरीर अक्टिव्ह राहते. तुमच्या क्षमतेनुसार रोज वेट लिफ्टिंग करा. अर्थात वेट लिफ्टिंग करण्याआधी डॉक्टरचा सल्ला घ्या आणि तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा.

शिवाय पोटावर नियंत्रण ठेवायचे असेल तर एकावेळी जास्त खाऊ नका. जेव्हा तुम्ही खात असाल तेव्हा लक्षात ठेवा की हळूहळू खा आणि अन्न व्यवस्थित चावा. हे तुम्हाला अधिक कार्यक्षमतेने तोडण्यास मदत करते, ज्यामुळे तुमच्या पोटाला पचणे सोपे होते. याव्यतिरिक्त, चांगले पचन दीर्घ कालावधीसाठी चांगले तृप्ति सुनिश्चित करते. जास्त प्रमाणात जेवू नका.. थोडे थोडे खात राहा.. गरजेपेक्षा जास्त खाऊ नका..एक लहान प्लेट घ्या.. त्यात थोडं थोडं घेऊन खात राहा. जेणेकरून जास्त खाल्ल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. मात्र, प्रत्यक्षात कमी प्रमाणात अन्न पोटात जाईल.

साखरेचे जास्त सेवन तुमच्या यकृतावर अतिरिक्त भार टाकते, ज्यामुळे चरबी जमा होऊ शकते. संध्याकाळी 5 नंतर मैदा, ब्रेड, पांढरा भात, केक आणि बिस्किटे यासारखे नियमित साखरेचे सेवन करू नका. जसजसा दिवस पुढे सरकतो तसतशी तुमची चयापचय क्रियाही कमी होऊ लागते. 
त्यामुळे गोड खायचे असेल तर सकाळची वेळ उत्तम.

डिस्क्लेमर : या लेखातील माहिती आणि सूचना अनेक स्त्रोतांमधून घेतलेल्या आहेत. फिटनेसविषयी जागृती वाढवणे हा त्यामागचा हेतू आहे. तुम्ही तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेससाठीची पावले उचलणे आवश्यक आहे.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी