Weight Loss Tips Marathi: वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा रस आहे फायदेशीर, असे होईल वजन कमी

कोरफड किती बहुगुणी आहे हे सगळ्यांना माहित आहे. कोरफडीच्या रसामुळे त्वचा तजेलदार होते. तसेच कोरफडचा गर केसांना लावल्यास केस लांबसडक आणि मजबूत होतात. कोरफडमुळे वजन कमी होण्यासही मदत होते, ही बाब फार कमी जणांना माहित आहे. जाणून घेऊया कोरफडचा रस कधी आणि कसा घ्यावा.

aloe vera for weight loss
कोरफड आणि वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरफड किती बहुगुणी आहे हे सगळ्यांना माहित आहे.
  • कोरफडीच्या रसामुळे त्वचा तजेलदार होते.
  • कोरफडमुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

Weight Loss Tips Marathi: कोरफड किती बहुगुणी आहे हे सगळ्यांना माहित आहे. कोरफडीच्या रसामुळे त्वचा तजेलदार होते. तसेच कोरफडचा गर केसांना लावल्यास केस लांबसडक आणि मजबूत होतात. कोरफडमुळे वजन कमी होण्यासही मदत होते, ही बाब फार कमी जणांना माहित आहे. जाणून घेऊया कोरफडचा रस कधी आणि कसा घ्यावा.

अधिक वाचा : Hing Water: प्या एक ग्लास हिंगाचे पाणी, होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा प्रभावी वापर

कोरफडच्या औषधी गुणांबद्दल अनेक संशोधन करण्यात आले आहे. कोरफडमध्ये अँटीओबेसिटी गुण असतात. म्हणजेच कोरफडचा रस घेतल्यास शरीरातील चरबी कमी होते. तसेच कोरफडचा रस घेतल्याने फार वेळ भूक लागत नाही. दररोज कोरफडचा रस प्यायल्यास पचनशक्ती मजबूत होते. तसेच कॅलरी बर्न होते आणि वजन कमी होतं.

अधिक वाचा : Health Tips : प्रत्येक पिझ्झा 7.8 मिनिटांनी आयुष्य करतो कमी, या गोष्टी खाणं लगेच बंद करा 

असे करा कोरफडचे सेवन

पाणी आणि कोरफड

तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या कोरफडचार रस पिऊ शकता. तसेच तुमच्या घरात कोरफडए झाड असेल तर त्याची ताज्या पानांपासून तुम्ही रस काढू शकता. यासाठी कोरफडीच्या झाडाचे एक पान घ्या, ते स्वच्छ धुऊन घ्या. चमच्याने त्यातील गर काढा, त्यात २ ते३ चमचे पाणी टाका आणि हा रस प्या.   

अधिक वाचा : Youth Day : 14 वर्षांवरील युवक मारतायत हुक्का, बनू शकतो काही दिवसात शरीराचा सांगाडा

लिंबाचा रस

कोरफडचा गर घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करा. त्यासाथी दोन चमचे कोरफडीचा गर, एक ग्लास पाणी आणि एक लिंबू पिळून टाका. जर याची चव चांगली लागली नाही तर त्यात आणखी एक लिंबू पिळून टाकू शकता.

अधिक वाचा : Side Effects Of Neem: कडुलिंबाची पाने चुकीच्या पद्धतीने खाऊ नका... आरोग्यला होतात हे 5 मोठे अपाय

(विशेष सूचना: सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी