Weight Loss Tips in Marathi: वजन कमी करण्यासाठी हे पाच पदार्थ करा दूर, अन्यथा केलेली मेहनत होईल बरबाद

सध्या वजन वाढण्याची समस्या बहुतांश लोकांना सतावत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक सकाळी धावायला जातात, कोणी जिममध्ये व्यायाम करतात तर कोणी डाएट फॉलो करतात. वजन कमी करताना आपण काही चुका टाळल्या पाहिजेत. अन्यथा वजन कमी करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी काय चुका टाळल्या पाहिजेत.

weight loss tips in marathi
वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ करा दूर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या वजन वाढण्याची समस्या बहुतांश लोकांना सतावत आहे.
  • वजन कमी करताना आपण काही चुका टाळल्या पाहिजेत.
  • जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी काय चुका टाळल्या पाहिजेत.

Avoid These Foods for Weight Loss: सध्या वजन वाढण्याची समस्या बहुतांश लोकांना सतावत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक सकाळी धावायला जातात, कोणी जिममध्ये व्यायाम करतात तर कोणी डाएट फॉलो करतात. वजन कमी करताना आपण काही चुका टाळल्या पाहिजेत. अन्यथा वजन कमी करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी काय चुका टाळल्या पाहिजेत. (weight loss tips in marathi avoid five food for weight loss journey )

अधिक वाचा: Beard Hairs : तुमच्याही दाढीचे केस गळतायत? करा हे सोपे उपाय

या चुका टाळा

वजन कमी करताना डाएटिशन सांगतात की डाएट आणि वजन कमी करण्याचा थेट संबंध असतो. जर तुम्ही खाण्यापिण्याची काळजी नाही घेतली तर वजन कमीए होणार नाही. काही लोक वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात. जास्त वेळ न खाल्ल्याने पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे भूक न लागणे, झोप न येणे अशा समस्या जाणवू शकतात. वजन कमी करण्यासाठी दररोज प्रोटीन कार्बोहायड्रेट तसेच इतर पोषक तत्व असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे. भरपूर पाणी प्यायले पाहिजे त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

अधिक वाचा: Good Cholesterol : चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवा आणि फिटनेसचा डबल आनंद घ्या, करा हे सोपे उपाय

हे पदार्थ टाळा

फळांचे सेवन

काही लोकांना फळं खायला फार आवडतात. वजन कमी करण्यासाठी लोक फळं खातात परंतु ही पद्धत चुकीची आहे. आंबा, चिकू, द्राक्ष तसेच केळीत जास्त कॅलरी असतात आणि त्यामुळे वजन वाढतं.

अधिक वाचा: Weight Loss Tips : तुमच्या किचनमध्येच आहे लठ्ठपणाचं उत्तर! हा एकच पदार्थ उतरवेल सगळी चरबी

तळलेले आणि उकडलेले पदार्थ

जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तळलेले आणि उकडलेले पदार्थ बिल्कूल खाऊ नका. त्यात भजी, समोसा, पराठे, सॅण्डविच, कचोरी हे पदार्थ टाळले पाहिजे तसेच तेलकट पदार्थांचे सेवनही करता कामा नये.

अधिक वाचा: High Cholesterol : कोलेस्टेरॉलची पातळी कशी नियंत्रित करावी, पाहा पाच सोपे मार्ग

चपाती आणि भात कमी

वजन कमी करण्यासाठी चपाती आणि भात कमी खाल्ले पाहिजे. त्यात न्युट्रिशस असतात. गहुच्या पीठात ज्वारी आणि बाजरी मिक्स करून त्याची चपाती खावी. गव्हाच्या चपातीत ग्लुटेन असतं आणि त्यामुळे कॅलरी वाढते.

अधिक वाचा: 'सायलेंट किलर' High BP ची ही लक्षणे दिसतात डोळ्यांत, हार्ट अटॅकपूर्वी या 7 गोष्टी करा फाॅलो

मटण ऐवजी चिकन आणि अंडी

काही लोकांना मांसाहार खुप आवडतो. मटण खाल्ल्यामुळे वजन वाढतं. मटण ऐवजी चिकन किंवा अंडी खावी, परंतु तेही कमी प्रमाणात. तरच वजन कमी होण्यास मदत होते.

अधिक वाचा: Morning Habits : 'या'5 सवयी तुमचा मूड दिवसभर फ्रेश आणि सकारात्मकता टिकवून ठेवतील 

दुग्धजन्य पदार्थ

पनीर, दूध, दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट्स असतात. या पदार्थांमुळे वजन वाढतं. वजन कमी करताना या पदार्थांचे सेवन कमी करावे.

अधिक वाचा: Ayurvedic body detox : बॉडी डीटॉक्स करण्याची आयुर्वेदातील प्रभावी आणि सोपी पद्धत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी