Weight Loss Mistakes: वजन कमी करताना करू नका या ५ चुका, अन्यथा होईल पश्चाताप

लोक वजन कमी करण्यासाठी काय काय उपाय करतात. कोणी वजन वाढण्याच्या भितीने खाणेच सोडून देतात तर काही लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. असे केल्यानंतरही काही लोकांचे वजन कमी होत नाही. कारण बर्‍याच वेळेला वजन कमी करण्याच्या नादात लोक काही चुका करतात आणि त्यामुळे हवे तसे रिझल्ट्स मिळत नाही, जेव्हा या चुका त्यांना कळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. जाणून घेऊया वजन कमी करताना कुठल्या चुका टाळाव्यात

weight loss tips in marathi
वजन कमी करताना करू नका या ५ चुका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लोक वजन कमी करण्यासाठी काय काय उपाय करतात.
  • बर्‍याच वेळेला वजन कमी करण्याच्या नादात लोक काही चुका करतात
  • आणि त्यामुळे हवे तसे रिझल्ट्स मिळत नाही, जेव्हा या चुका त्यांना कळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

Weight Loss Tips in Marathi : लोक वजन कमी करण्यासाठी काय काय उपाय करतात. कोणी वजन वाढण्याच्या भितीने खाणेच सोडून देतात तर काही लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. असे केल्यानंतरही काही लोकांचे वजन कमी होत नाही. कारण बर्‍याच वेळेला वजन कमी करण्याच्या नादात लोक काही चुका करतात आणि त्यामुळे हवे तसे रिझल्ट्स मिळत नाही, जेव्हा या चुका त्यांना कळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. जाणून घेऊया वजन कमी करताना कुठल्या चुका टाळाव्यात. 

  1. वजन कमी करणे म्हणजे स्लिम ट्रिम होणे नाही. हा तुमचा आरोग्याचा विषय आहे. त्यात तुमच्या शरीराची स्ट्रेंथ, स्टॅमिना, फ्लेक्सिबिलिटीचाही समावेश आहे. त्यामुळे वजन कमी करताना शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. 
  2. वजन कमी करण्याचे परिणाम प्रत्येकाचे सारखे नसतात, काही जणांना डाएटमुळे फरक पडतो तर काही जणांना व्यायामामुळे फरक पडतो. अशा वेळी तज्ञांशी बोलून वजन कमी करण्यास सुरूवात करावी. 
  3. कुठलेही चांगले काम करताना त्याचे योग्य परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो. म्हणून योग्य व्यायाम आणि योग्य डाएटचा परिणाम दिसायला वेळ लातो. यासाठी कमीत कमी ३ महिन्यांचा अवधी लागतो म्हणून वजन कमी करताना कितीही ताण आल्यास धीर धरावा. 
  4. थोडा वेळ व्यायाम करून वजन कमी होत नाही. एका एभ्यासानुसार आपण वर्षभरात शरीराच्या १० टक्के वजन कमी केल्यास शरीरासाठी चांगले असते. लवकर वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही कुठलीतरी व्याधी ओढवून घेऊ शकता. 
  5. वजन कमी करण्यासाठी काही लोक तासनतास व्यायाम करतात आणि कमी खातात. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर योग्य डाएट घेणे गरजेचे आहे. दररोज तासनतास व्यायाम करण्यापेक्षा अर्धा तास व्यायाम करणे अपेक्षित आहे. तसेच वजन कमी करताना इंटरनेटवर दिलेल्या टिप्स डोळे जसेच्या तसे फॉलो करणे चुकीचे आहे. वजन कमी करण्यासाठी तज्ञांचा सल्ला आणि मदत घ्यावी.    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी