Weight Loss by Drinking Water : मुंबई : वाढते वजन ही आता मोठी समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात, परंतु हवे तसे रिझल्ट मिळतातच असे नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पाणी पिऊनही वजन कमी करता येतं. हो हे खरं आहे. पाणी पिऊन वजन कमी करता येतं. आठ किमी धावून तुम्ही जेवढ्या कॅलरी बर्न करतात तेवढ्याच कॅलरी पाणी पिऊन होतात. पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला फार भूक लागत नाही आणि ओव्हर इटिंगची सवय मोडते. त्यामुळेच वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊया पाणी पिऊन वजन कसे कमी करता येतं.
पाण्यात कुठल्याही प्रकाची कॅलरी नसते. पाण्यामुळे शरीराला उर्जाही मिळते आणि शरीराती विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मद होते. इतकेच नाही तर पाण्यामुळे फॅट्सही बर्न होतं.
जर तुम्हाला कमी वेळेत जास्त वजन कमी करायचे असेल तर पाणी पिण्यास विसरू नका, पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं तसेच पुन्हा पुन्हा खाण्यासाठी भूक लागत नाही. त्यामुळे वजननी लवकर कमी होतं.
अनेक लोक जेवताना पाणी पितात किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी पितात. परंतु ही सवय चुकीची आहे, कारण यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. इतकेच नाही तर यामुळे वजनही वाढू शकतं. यासाठी जेवणापूर्वी पाणी प्या. त्यामुळे ओवर इटिंग होणार नाही.
पोटातली चरबी करण्यासाठी तुम्ही किती फॅट घेता यावर लक्ष देणे गरजेचे आहे. कोमट पाण्यामुळे शरातील फॅट कमी होतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात दिवसातून कमीत कमी एकदा कोमट पाणी पिणे आवश्यक आहे.
पाण्याचा कुठलीही चव नसते. त्यासाठी तुम्ही पाण्यात लिंबू, आलं, बडीशेप किंवा फळांचे तुकडेही टाकू शकता.
डिस्क्लेमर : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.