Weight Loss by Walking : चालण्यानेही वजन होतं कमी, जाणून घ्या मॉर्निंग वॉकचा फायदा आणि खास टिप्स

सध्या प्रत्येक व्यक्तीच्या समोर वजन कमी करणं किंवा नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी लोक डाएट पासून व्यायामपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करतात. परंतु हवे तसे रिझल्ट्स मिळतीलच असे नाही.  वजन कमी करण्यासाठी लोक सकाळी धावायला किंवा चालायलाही जातात. चालण्यानेही वजन कमी होतचं तसेच त्याचे अनेक फायदेही आहेत.

morning walk
चालण्यानेही होतं वजन कमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या प्रत्येक व्यक्तीच्या समोर वजन कमी करणं किंवा नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान आहे.
  • वजन कमी करण्यासाठी लोक सकाळी धावायला किंवा चालायलाही जातात.
  • चालण्यानेही वजन कमी होतचं तसेच त्याचे अनेक फायदेही आहेत.

Walking For Weight Loss: मुंबई : सध्या प्रत्येक व्यक्तीच्या समोर वजन कमी करणं किंवा नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी लोक डाएट पासून व्यायामपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करतात. परंतु हवे तसे रिझल्ट्स मिळतीलच असे नाही.  वजन कमी करण्यासाठी लोक सकाळी धावायला किंवा चालायलाही जातात. चालण्यानेही वजन कमी होतचं तसेच त्याचे अनेक फायदेही आहेत. सकाळी २० ते २५ मिनिटे चालण्याची सवय लावा त्यामुळे नक्की फरक पडेल. जाणून घेऊया चालण्याचे फायदे आणि वजन कमी करण्याच्या खास टिप्स


दररोज चालण्याचे फायदे

सकाळी किंवा सांयकाळी चालल्यास शरीरातील साडे तीन हजार कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन कमी होतं किंवा वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. सर्व वयातील लोकांनी चालणे आवश्यक आहे. सकाळी सकाळी चालल्यास आपल्या दिवसभर ऊर्जा मिळते. 

हृदयाला होतो फायदा

सकाळी सकाळी चालल्यास हृदय आणखी निरोगी होतं. संशोधनानुसार दररोज १५ हजार पावलं चालणार्‍या व्यक्तींना हृदयरोगाचा धोका कमी होतो. चालल्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होत तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. 


मानसिक आरोग्य

संशोधनानुसार मेंदूर हार्मोन्स आणि नर्व्ह सिस्टर्म सक्रिय असतात. त्यामुळे आपली  स्मृती चांगली राहते. सकाळी किंवा सांयकाळी चालल्यास ताण-तणाव, डिमेंशिया, नैराश्य आणि स्मृतीभंशासारखे आजाराचा धोका कमी होतो. 


फुफ्फुसं राहतात निरोगी

सकाळी किंवा संध्याकाळी चालल्यास फुफ्फुसं निरोगी राहतात. चालल्याने फुफ्फुसांवर विषाणू संक्रमण होत नाहीत. 

किती चाललं पाहिजे

तज्ञांनुसार प्रत्येक व्यक्तीला दिवसातून ३० मिनिटे चालले पाहिजे. म्हणजेच १० हजार पावलं किंवा ६ ते ७ किमी चालले पाहिजे. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. चालताना दीर्घ श्वास घेतले पाहिजे त्यामुळे ऑक्सिजन फुफ्फुसांपर्यंत पोहोचेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी