Weight Loss: खुर्चीवर बसून होईल वजन कमी, फॉलो करा या खास टिप्स

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम करतात, डाएट फॉलो करतात. त्यानंतरही हवे तसे रिझल्ट्स मिळतील असे नाही. अशा वेळी काही सोपे व्यायाम केल्यास फरक पडतो. खुर्चीवरचे काही व्यायाम आपण जाणून घेऊया, या व्यायामामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. हे व्यायाम तुम्ही घरी आणि ऑफिसमध्येही करू शकता.

weight loss chair exercise
खुर्चीवरून वजन कमी करण्यासाठीचे व्यायाम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम करतात, डाएट फॉलो करतात. त्यानंतरही हवे तसे रिझल्ट्स मिळतील असे नाही.
  • अशा वेळी काही सोपे व्यायाम केल्यास फरक पडतो.
  • खुर्चीवरचे काही व्यायाम आपण जाणून घेऊया, या व्यायामामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.

Weight Loss:  हल्ली वजन कमी करणे हे एक आव्हान झाले आहे. बदलती लाईफस्टाईल, वर्क फ्रॉम होम सारख्या गोष्टींमुळे अनेकांना ही समस्या जाणवत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम करतात, डाएट फॉलो करतात. त्यानंतरही हवे तसे रिझल्ट्स मिळतील असे नाही. अशा वेळी काही सोपे व्यायाम केल्यास फरक पडतो.  खुर्चीवरचे काही व्यायाम आपण जाणून घेऊया, या व्यायामामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. हे व्यायाम तुम्ही घरी आणि ऑफिसमध्येही करू शकता. (weight loss tips in marathi chair exercise for belly fat reduce read in marathi)

खुर्चीवरून वजन कमी करण्यासाठीचे व्यायाम । Exercises With Chair For Belly Fat Loss

अधिक वाचा :  Mouth Odor: तोंडाला दुर्गंधी येते? हे तीन अवयव असतात कारण, वाचा सविस्तर

 

हॅगिंग बॉडी 

 
घरात खुर्चीवर बसून करण्याचा हा सोपा व्यायाम आहे. या व्यायामामुळे पोटातील आणि मांडीची चरबी कमी होते. हा व्यायाम करण्यासाठी खुर्चीवर बसावे आणि दोन्ही हातांनी हँडल पकडावे. त्यानंतर शरीर वरच्या बाजूने उचलावे, ९० अंशाच्या कोनात शरीर दिसेल. हा व्यायाम आणखी प्रभावी करण्यासाठी दोन्ही पाय जोडून तुम्ही वर उचलू शकता. 

सिजर एक्सरसाइज


खुर्चीवर बसावे आणि खुर्चीच्या दोन्ही हँडलवर हात ठेवून पाय हवेत उचलावे आणि क्रिस क्रॉस करत चालावे. या व्यायामात तुम्हाला पाय हवेत ठेवून चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा व्यायाम किमान 10 वेळा करावा. यात तुम्ही गुडघे खाली वर करू शकता. 

अधिक वाचा :  Causes of Paralysis:खबरदार तुम्हालाही होऊ शकतो अर्धांगवायू? पाहा का होतो अर्धांगवायू आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय

ट्विस्ट 


खुर्चीवर बसून उजव्या बाजूला शरीर वळवावे आणि डाव्या बाजूला गुडघे वळवावे. यामुळे तुमचे शरीर ट्विस्ट होईल. दोन्ही बाजूने हा व्यायाम करावा. हा व्यायाम तुम्ही घरी आणि ऑफिसमध्येही करू शकता. या व्यायाम प्रकारात तोल सांभाळावा अन्यथा पडण्याची शक्यता आहे. 

कैट काऊ

हा व्यायाम करण्यासाठी खुर्चीवर बसा आणि आपले दोन्ही हात पायांवर ठेवा. आता शरीर पुढे घेऊन खांदे मागे घेण्याचा प्रयत्न करा. असे करताना दीर्घ श्वास घ्या. 3-3 च्या सेटमध्ये हा व्यायाम करा, या व्यायामामुळे पोटाची चरबी कमी होते. 

अधिक वाचा :  Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर करा फक्त हे चार उपाय, आणि पहा चमत्कारिक फरक

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी