Weight loss: मुंबई : कामाच्या नादात प्रत्येकालाच जिममध्ये जाऊन व्यायाम करून वजन कमी करता येतंच असे नाही. अशा वेळी घरच्या घरी व्यायाम केल्यास नक्की वजन कमी होईल. जाणून घेऊया काही व्यायामाचे प्रकार, हे व्यायाम तुम्ही दररोज १५ मिनिटे केल्यास आठवडाभरात चरबी कमी होऊन वजन कमी होईल.
हा व्यायाम तुम्ही घरच्या घरी करू शकता. चटई आंथरून हा व्यायाम करावा. यामुळे मांडीतील फॅट बर्न होतील आणि वजन कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर आहे. यासाठी जमीनीवर झोपून ब्रिजच्या पोझिशनमध्ये यायचे आहे. नंतर हात बाजूला घेऊन कंबर वर उचलायची आहे. त्यनंतर पाय स्ट्रेच, नंतर पाय वरच्या दिशेने स्ट्रेच करा. यामुळे नक्की वजन कमी होईल.
वजन कमी करण्यासाठी हा फार सोपा व्यायाम प्रकार आहे. पुश अप केल्यामुळे मसल्स मजबूत होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
सकाळी सकाळी धावल्यास वजन कमी होतं. व्यायामाच्या प्रकारातील वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय धावणे हा आहे. यामुळे सकाळी स्वच्छ हवा मिळते तसेच शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियाही चांगली होते.
Disclaimer: सदर माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. व्यायाम करण्यापूर्वी एका तज्ञांचा सल्ला घ्यावा. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.