Weight Loss Tips : व्यायाम करायला मिळत नाही वेळ? ब्रश करताना करा Work Out आणि पहा फरक

सध्या प्रत्येकजण एक स्ट्रेसफुल आणि धावपळीचे आयुष्य जगत आहे. त्यात वजन वाढण्याची समस्या आणि व्यायाम करायला वेळ नसणे आणखी एक डोकेदुखी वाढली आहे. लोकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे आणि शारिरीक हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे वजन वाढणे, शुगर, हायपरटेन्शन सारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.

weight loss
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या प्रत्येकजण एक स्ट्रेसफुल आणि धावपळीचे आयुष्य जगत आहे.
  • त्यात वजन वाढण्याची समस्या आणि व्यायाम करायला वेळ नसणे आणखी एक डोकेदुखी वाढली आहे.
  • लोकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे आणि शारिरीक हालचाल कमी झाली आहे.

Belly Fat exercise : सध्या प्रत्येकजण एक स्ट्रेसफुल आणि धावपळीचे आयुष्य जगत आहे. त्यात वजन वाढण्याची समस्या आणि व्यायाम करायला वेळ नसणे आणखी एक डोकेदुखी वाढली आहे. लोकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे आणि शारिरीक हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे वजन वाढणे, शुगर, हायपरटेन्शन सारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. वजन कमी करणे हे आव्हान झाले आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय उपाय करतात. पहाटे उठून व्यायाम करतात, कोणी धावायला जातं कोणी योगा करतं तर कोणी डाई फॉलो करतो. इतकेच नाही तर काही लोक औषधं घेण्यासही सुरूवात करतात. नेहमीच या उपायांमुळे हवे तसे रिझल्ट्स मिळतात असे नाही. अशा वेळी आम्ही तुम्हाला काही व्यायाम सांगणार आहोत ते तुम्ही ब्रश करतानाही करू शकता आणि वजन कमी करू शकता. (weight loss tips in marathi do work out in while brush)

सिटअप्स

दात घासताना हा व्यायाम तुम्ही करू शकता. दिवसाला तुम्ही पाच मिनिटांनी हा व्यायाम सुरू करू शकता त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. सुरूवातील पाच मिनिटं हा व्यायाम केल्यानंतर हळूहळून तुम्ही व्यायामाची वेळ वाढू शकता.

लंजेज

लंजेज हा व्यायाम प्रकारही तुम्ही ब्रश करताना करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पाच मिनिटे लागतील. लंजेजमुळे मांड्यातील फॅट कमी होईल. लवकरच तुम्ही हा व्यायाम सुरू करून दिवसाची सुरूवात या व्यायामाने करू शकता.

साइड स्ट्रेच

साईड स्ट्रेचमुळे हातात जमा झालेले फॅट कमी होण्यास मदत होते. हे सर्व व्यायाम केल्यास तुमच्या शरीरात जमा झालेले अतिरिक्त फॅट लवकर कमी करू शकता. हे व्यायाम फार सोपे असून तुम्ही घरच्या घरी आणि कमी वेळेत करू शकता.

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी