पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खुर्चीत बसल्या बसल्या करायचे सोपे व्यायामप्रकार

Weight Loss Tips In Marathi, Easy exercises to do while sitting in a chair to reduce belly fat : खुर्चीत बसल्या बसल्या सोपे प्रभावी उपाय करू शकता. या उपायांच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवणे आणि पोटावरील चरबी कमी करणे शक्य आहे. 

Weight Loss Tips In Marathi
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खुर्चीत बसल्या बसल्या करायचे सोपे व्यायामप्रकार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खुर्चीत बसल्या बसल्या करायचे सोपे व्यायामप्रकार
  • बैठे काम करणाऱ्यांचे वजन प्रामुख्याने शरीराच्या कंबरेजवळच्या भागात वेगाने वाढते
  • खुर्चीत बसल्या बसल्या करायचे व्यायाम

Weight Loss Tips In Marathi, Easy exercises to do while sitting in a chair to reduce belly fat : दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करणे तसेच जंकफूड, फास्टफूड आणि तळलेले पदार्थ खाणे यामुळे वेगाने वजन वाढते. बैठे काम करणाऱ्यांचे वजन प्रामुख्याने शरीराच्या कंबरेजवळच्या भागात वेगाने वाढते. यामुळे पोटावरील चरबीचा थर वाढत जातो. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. खुर्चीत बसल्या बसल्या हे उपाय करणे सहज शक्य आहे. आपण ऑफिसमध्ये कामादरम्यान छोटा ब्रेक घेऊन खुर्चीत बसल्या बसल्या सोपे प्रभावी उपाय करू शकता. या उपायांच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवणे आणि पोटावरील चरबी कमी करणे शक्य आहे. 

तब्येत पाणी । लाइफफंडा

Remedies to postpone periods: मासिक पाळी लांबवण्याचे नैसर्गिक उपाय, औषधांशिवाय होईल काम

Oral health tips: रोज ब्रश करताना किती टूथपेस्ट वापरावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

खुर्चीत बसल्या बसल्या करायचे व्यायाम

1. खुर्चीत पाठीचा कणा ताठ ठेवून व्यवस्थित बसा. आता पायांना हात लावण्यासाठी बसल्या बसल्या खाली वाका. एकदा उजव्या आणि एकदा डाव्या पायाला (पाऊल) दोन्ही हात लावण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम दर 2 तासांनंतर 20 वेळा करा. उजव्या पायाला (पाऊल) दोन्ही हातांनी 10 वेळा स्पर्श करा. नंतर डाव्या पायाला (पाऊल) दोन्ही हातांनी 10 वेळा स्पर्श करा.

2.खुर्चीवर मागे रेलून दोन्ही हाताने मागे घट्ट पकडून ठेवा.  दोन्ही पाय एकत्र करुन ते पोटाच्या दिशेने आणा. त्यानंतर ते बाहेरच्या दिशेला सोडा. असे तुम्हाला करायचे आहे. साधारण 10 वेळा ही पूर्ण क्रिया करा. दर 2 तासांनी ही कृती 10 वेळा करा.

3. खुर्चीवर बसून राहा. उजवा हात उजवीकडे आणि डावा हात डावीकडे सैल सोडा. बसलेल्या जागेवरच एकदा उजवीकडे (10 वेळा) आणि एकदा डावीकडे (10 वेळा) वाका. कंबरेजवळ शरीराच्या साइडच्या भागातील चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम दर 2 तासांनंतर 20 वेळा करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी