Weight Loss Atta: बाजरीची भाकरी खा आणि वजन कमी करा, वाचा वजन कमी करण्याचे आणखी घरगुती टिप्स

सध्या वजन कमी करण्यासाठी लोक नाना तर्‍हेचे उपाय करतात. कोणी योगा करतं, कोणी जिममध्ये जाऊन तानसतान घाम गाळतात. त्यानंतरही वजन कमी होत नाही. फक्त व्यायाम किंवा योगा करून वजन कमी होत नाही तर त्यासाठी योग्य आहारही घ्यावा लागतो. योग्य आहार घेण्यासाठी आपल्याला फार कष्ट घेण्याची गरज नाही.

weight loss
वजन कमी करण्याच्या टिप्स मराठीत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या वजन कमी करण्यासाठी लोक नाना तर्‍हेचे उपाय करतात
  • कोणी योगा करतं, कोणी जिममध्ये जाऊन तानसतान घाम गाळतात
  • फक्त व्यायाम किंवा योगा करून वजन कमी होत नाही तर त्यासाठी योग्य आहारही घ्यावा लागतो.

Weight Loss Atta: मुंबई : सध्या वजन कमी करण्यासाठी लोक नाना तर्‍हेचे उपाय करतात. कोणी योगा करतं, कोणी जिममध्ये जाऊन तानसतान घाम गाळतात. त्यानंतरही वजन कमी होत नाही. फक्त व्यायाम किंवा योगा करून वजन कमी होत नाही तर त्यासाठी योग्य आहारही घ्यावा लागतो. योग्य आहार घेण्यासाठी आपल्याला फार कष्ट घेण्याची गरज नाही. घरच्या पदार्थांमुळेही आपण वजन कमी करू शकतो. घरी आपण चपाती किंवा भाकरी खाऊन वज कमी करू शकतो. त्यात गहू आणि बाजरीचाही समावेश आहे. जाणून घेऊया चपाती किंवा भाकरी खाऊन वजन कमी कसे करता येतं.

अधिक वाचा : Liver Health : दारु आणि सिगरेटप्रमाणे ‘या’ गोष्टींमुळेही खराब होतं यकृत, वाचा सविस्तर

कोंड्याची भाकरी

अनेक जणांना भाकर खाण्यास आवडते. आजही अनेक घरात ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाल्ली जाते. ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी चांगलीच असते. तसेच कोंड्याची भाकरीही आरोग्यासाठी चांगली असते. कोंड्याच्या भाकरीत फायबर असतात त्यामुळे पोटाचे त्रास होत नाही. तसेच कोंड्यात पोटॅशिय, फॉस्फोरस, कॅल्शिय, सिलिनियम, मॅग्नेशियम आणि विटामिन ई आणि बी कॉम्लेक्स असतं. कोंड्याची भाकर खाल्ल्यामुळे वजन कमी होतं. तसेच हृदयाचे आजार होत नाहीत.

अधिक वाचा : Aluminum Foil Tips : अॅल्युमिनियम फॉइल अनेक वेदनांमध्ये असणे गुणकारी, असा करा वापर

बाजरीची भाकर

वजन कमी करण्यासाठी बाजरीची भाकर फार उपयोगी असते. बाजरीच्या भाकरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यात ९७ कॅलरी असतत आणि ही भाकर खाल्ल्यानंतर खुप वेळ भूक लागत नाही. बाजरीची भाकर खाल्ल्याने वजन कमी होतं. बाजरीच्या भाकरीत मोठ्या प्रमाणात फायबर आणि विटामिन्स असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं.

अधिक वाचा : Heart Attack: सतत 8 तास बसून काम केल्याने वाढू शकतो हृदयविकाराचा धोका

नाचणीची भाकर

 

नाचणीची भाकरही शरीरासाठी फायदेशीर आहे. नाचणीच्या भाकरीत फायबर आणि अमीनो ऍसिड असतं. त्यामुळे नाचणीची भाकर खाल्ल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही. फार वेळ भूक न लागल्याने ओवर इटिंगची समस्या जाणवत नही. नाचणीची भाकर पचायलाही जड जात नाही. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी नाचणीची भाकर ही पौष्टिक मानली जाते. नाचणीच्या भाकरीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी