Weight Loss: वजन वाढवण्याचं नाही तर कमी करण्याचं काम करतील केळी, फक्त करा हे काम

Weight loss tips: वजन वाढण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला तुम्हाला अनेकांनी दिला असेल. पण याच केळींमुळे तुमचे वजन कमी करता येऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का?

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Banana for Weight Loss: केळी खाल्ल्याने सुद्धा वजन कमी केले जाते. अनेकदा खासकरुन मुलींना असे वाटते की, बनाना शेक किंवा केळी खाल्ल्याने वजन वाढते आणि त्यामुळे मुली केळी खाणं शक्यतो टाळतात. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये. अनेक न्यूट्रिशनिस्ट वजन कमी करण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला देत असतात. प्रत्यक्षात केळी खाल्ल्याने वजन वाढते सुद्धा. मात्र, योग्य प्रमाणात केळी खाल्ली तर तुम्ही वजन कमी देखील करु शकता. जाणून घेऊयात केळी कुठल्या प्रमाणात खाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. (weight loss tips in marathi eat bananas to reduce your fat)

फायबर

केळीमध्ये आढळणारे सोल्युबल फायबर हे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे केळी खाल्ल्यानंतर तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी आपण जास्त खाणे टाळतो आणि त्यासोबतच खाण्याची इच्छाही होत नाही. त्यासोबतच फायबर हे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तसेच पचन प्रक्रिया सुधारते आणि त्यामुळे लठ्ठपणाची शक्यताही कमी होते.

अधिक वाचा : Liquor side effects : मद्यशौकिनांसाठी धोक्याची घंटा! ही लक्षणं दिसली तर लगेच थांबवा मद्यपान

कमी कॅलरीज

केळी खाल्ल्याने तुम्ही तुमचे पोट दिवसभर भरलेले ठेवू शकता आणि तुम्ही कमी कॅलरीज देखील खाऊ शकता. यासाठी केळीसोबत दही, पीनट बटर किंवा अंडी देखील खाऊ शकता. हे तुमच्यासाठी पूर्ण अन्न असेल आणि तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला चालना देईल.

अधिक वाचा : Easy Weight Gain Foods: हाडकुळ्या शरीरयष्टीमुळे निराश आहात तर आजपासून खा या 6 गोष्टी, चारचौघात दिसाल भारदस्त

मधुमेही रुग्णांना

ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केळी खाऊ शकतात. केळी खाल्ल्याने शरीर ग्लुकोजवर सुरळीत प्रोसेस सुरू करते आणि त्यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होते.

प्री-वर्कआऊट फूड 

केळी हे एक चांगले प्री-वर्कआऊट फूड देखील आहे. मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फोलेटने भरपूर असलेले केळी वजन वाढण्याच्या भीती न बाळगता तुम्ही खाऊ शकता. केवळ साधे केळी किंवा ओट्समध्ये केळी टाकून किंवा मिल्क शेक बनवून सुद्धा खाऊ शकता. 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी