Weight loss tips in marathi : वजन कमी करण्यासाठी सुका मेवा ठरतो फायदेशीर, असे करा सेवन

सध्या वजन वाढण्याची समस्या प्रत्येकाला जाणवत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय उपाय करतात. काही लोक मॉर्निंग वॉकसाठी जातात कोणी डाएट फॉलो करतात तर काही जण जिममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढे केल्यानंतरही प्रत्येकाला हवे तसे रिझल्ट्स मिळतीलच असे नाही. अशा वेळी वजन कमी करणे हे थोडे चॅलेंजिंग असतं. वजन वाढल्याने मधुमेह, थायरॉईड तसेच हृदयासंबंधित आजारही होतात.

dry fruits
सुका मेवा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या वजन वाढण्याची समस्या प्रत्येकाला जाणवत आहे.
  • वजन कमी करणे हे थोडे चॅलेंजिंग असतं.
  • वजन वाढल्याने मधुमेह, थायरॉईड तसेच हृदयासंबंधित आजारही होतात.

Dry Fruits Benefits For Weight Loss: सध्या वजन वाढण्याची समस्या प्रत्येकाला जाणवत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय उपाय करतात. काही लोक मॉर्निंग वॉकसाठी जातात कोणी डाएट फॉलो करतात तर काही जण जिममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढे केल्यानंतरही प्रत्येकाला हवे तसे रिझल्ट्स मिळतीलच असे नाही. अशा वेळी वजन कमी करणे हे थोडे चॅलेंजिंग असतं. वजन वाढल्याने मधुमेह, थायरॉईड तसेच हृदयासंबंधित आजारही होतात. यासासाठी वजन कमी करणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुका मेव्याचा समावेश करावा. सुक्या मेव्यामुळे लवकर वजन कमी होतं. जाणून घेऊया ड्राय फ्रुट्समुळे वजन कमी कसं होतं?

अधिक वाचा :  Weight Loss Tips Marathi: वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा रस आहे फायदेशीर, असे होईल वजन कमी

न्याहारीत करा सुक्या मेव्याचा समावेश

जर तुमचे वजन वाढत असेल तर सकाळी लाईट नाश्ता करा. काही लोक सकाळी भाजी चपाती, पराठा खाणे पसंत करतात. सकाळी जर तुम्ही सुका मेवा खाल्ला तर तुमचे पोटही भरते आणि वजन कमी होण्यास मदतही होतो. ज्यांचे वजन वाढले आहे, त्यांनी कार्बोहायड्रेटचे सेवन करता कामा नये. त्यामुळे वजन आणखी वाढू शकतं. सुक्या मेव्यामुळे पचनशक्ती चांगली होते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. 

अधिक वाचा :  Cardiac Arrest: अनेक मोठ्या कलाकारांचा कार्डियक अरेस्ट घेतलाय जीव...


पिस्त्याचे करा सेवन

वजन कमी करण्यासाठी पिस्ता खाणे गरजेचे आहे. पिस्त्यामध्ये फायबर असतं त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. तसेच पिस्ता खाल्ल्यामुळे फार वेळ भूक लागत नाही. फार वेळ भूक न लागल्याने ओवर इटींग टाळता येतं. सकाळी नाश्त्यात आवर्जून पिस्ता खावा.  

अधिक वाचा :  Dinner Diet: रात्री Dinner ला चुकूनही खाऊ नका 'या' पाच गोष्टी बिघडू शकते तब्येत

खजुराचे सेवन

वजन कमी करण्यासाठी खजुर खावे. खजूरमध्ये फायबर असतं तसेच खजुरात विटामिन बी ५ ही असतं. त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि लवकर वजन कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा : Cardiac Arrest : ‘हार्ट अटॅक’ आल्यावर काय करायचं? जीवन की मृत्यू हे ठरवणारी 5 मिनिटं असतात निर्णायक


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी