Healthy Breakfast : हेल्दी ब्रेकाफास्टमुळे होईल वजन कमी, वाचा खास टिप्स

सध्या वाढते वजन ही मोठी समस्या आहे. एकवेळ वजन वाढवणे सोपे आहे आहे परंतु वजन कमी करणे कठीण होऊन बसतं. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात. योगा, व्यायाम, मॉर्निंग वॉक, डाएट. एवढे केल्यानंतरही वजन कमी होतंच असे नाही. वजन कमी करण्यासाठी आहार फार महत्त्वाचा असतो. सकाळी सकाळी योग्य न्याहारी केल्यावर वजन कमी होण्यास मदत होते.

weight loss tips in marathi
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या वाढते वजन ही मोठी समस्या आहे.
  • एकवेळ वजन वाढवणे सोपे आहे आहे परंतु वजन कमी करणे कठीण होऊन बसतं.
  • सकाळी सकाळी योग्य न्याहारी केल्यावर वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss Breakfast Recipes: सध्या वाढते वजन ही मोठी समस्या आहे. एकवेळे वजन वाढवणे सोपे आहे आहे परंतु वजन कमी करणे कठीण होऊन बसतं. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात. योगा, व्यायाम, मॉर्निंग वॉक, डाएट. एवढे केल्यानंतरही वजन कमी होतंच असे नाही. वजन कमी करण्यासाठी आहार फार महत्त्वाचा असतो. सकाळी सकाळी योग्य न्याहारी केल्यावर वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊया हेल्दी ब्रेकफास्ट ज्यामुळे तुमचे वजन लवकर कमी होईल.

ऑम्लेट – वजन कमी करण्यासाठी आहारात अंड्याचा समावेश करा. अंड्यातील सफेद भागात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. अंड्यात पोषक तत्व असतात तसेच अंड हे लो कॅलरी फूड आहे. हे आणखी पौष्टिक बनवण्यासाठी त्यात थोडेसे पनीर आणि भाज्या घाला. यामुळे अंड आणखी चवदार होईल. हे अंड खाल्ल्यानंतर फार वेळे भूक लागणार नाही आणि तुमचे वजन कमी होईल.

टोफू भुर्जी – वजन कमी करण्यासाठी तुम्ही टोफूचा वापर करू शकताअ. टोफूपासून चवदार भुर्जी बनते. त्यासाठी टोफू घ्या त्यात एक वाटी बालसॅमिक सिरका, ड्राय ऑर्गेनो आणि किसून लसूण घाला. हे मिश्रण रात्रभर एका भांड्यात ठेवा. सकाळी यात कांदा आणि शिमला मिरची घालून रोस्ट करा. टोफूचा रंग ब्राऊन झाल्यानंतर तुम्ही खाऊ शकता.

भोपळा आणि सफरचंदाची स्मूदी – स्मूदी म्हणजे एक प्रकारचा रस असतो. स्मूदीमुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. यासाठी बदाम दूध, सफरचंद, भोपळा, दही आणि बर्फ एकत्र घेऊन मिक्सरमध्ये ग्राईंड करा. त्यानंतर एक चमचा ग्रेनोला टाका आणि हे स्मूदी पिऊन टाका. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

एवोकाडो टोस्ट- एवोकाडो हे फळ असून ते खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. एवोकाडो खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नही. एवोकाडो टोस्ट साठी तुम्हाला ब्रेड टोस्ट करावा लागेल त्यानंतर मॅश केलेला एवोकाडो त्यावर जॅम किंवा मस्क्यासारखे लावायचे आहे. ब्रेडवर तुम्ही कोथंबीर, मीठ आणि लिंबू घालू शकता त्यामुळे एवोकाडो टोस्टची चव आणखी वाढेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी