Weight Loss Fruit: आहारात करा या फळाचा समावेश, पोटाची चरबी होईल कमी

वजन वाढण्याची समस्या ही गेल्या काही दिवसांत वाढत चालली आहे. वजन कमी करणे हे तसे सोपे नाही, त्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच योगा करण्याची गरज असते. वजन कमी करण्यासाठी आहार म्हणजेच योग्य डाएट असणे गरजेचे आहे. फळं खाल्यामुळेही वजन कमी होतं.

orange
संत्रीचे सेवन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन वाढण्याची समस्या ही गेल्या काही दिवसांत वाढत चालली आहे.
  • वजन कमी करणे हे तसे सोपे नाही, त्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच योगा करण्याची गरज असते.
  • फळं खाल्यामुळेही वजन कमी होतं.

Orange as Weight Loss Fruit: मुंबई : वजन वाढण्याची समस्या ही गेल्या काही दिवसांत वाढत चालली आहे. वजन कमी करणे हे तसे सोपे नाही, त्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच योगा करण्याची गरज असते. वजन कमी करण्यासाठी आहार म्हणजेच योग्य डाएट असणे गरजेचे आहे. फळं खाल्यामुळेही वजन कमी होतं. त्यात संत्र्याचा समावेश आहे. त्यामुळे पोटातील चरबी कमी होते तसेच संत्री खाल्ल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (weight loss tips in marathi eat oranges will help for weight loss and belly fat)

संत्री खाल्ल्यामुळे असे वजन होईल कमी

पचनशक्ती होईल मजबूत


संत्रीत मोठ्या प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. संत्री खाल्ल्यामुळे फार वेळ भूक लागत नाही त्यामुळे दर काही वेळाने खाण्याची गरज पडणार नाही आणि वजन वाढणार आहे. पचनशक्ती मजबूत झाल्याने वजन कमी होण्यास किंवा नियंत्रित होण्यास आणखी मदत होते. 

शरीरात पाण्याचे प्रमाण राहतं योग्य

संत्र्यात ८० टक्के पाणी असतं. त्यामुळे संत्री खाल्ल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. वजन कमी करण्या प्रक्रियेत पाण्याचे प्रमाण कमी होता कामा नये. आणि संत्री खाल्ल्यामुळे शरीरात पाण्याचेप्रमाण योग्य राहतं. म्हणून वजन कमी करण्यासाठी नियमित संत्री खावीत. 

साखरेचे प्रमाण होतं कमी

वजन वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे साखरेचे सेवन. जर तुम्ही दररोज एक संत्र खाल्यास तुम्हाला साखर खावीशी वाटणार नाही. तसेच संत्र्यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी होते तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. 
 

शरीरातील विषारी पदार्थ पडतात बाहेर
 

संत्र्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. संत्र्यात विटामिन सी असतं त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. 

(विशेष सूचना : सदर माहिती ही इंटरनेटवरील माहितीच्या आधारे संकलित केली आहे. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी एका तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी