Weight loss tips in marathi : अंडी खाल्ल्यामुळेही होतं वजन कमी, फक्त ऍड करा हे तीन पदार्थ

वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात, कोणी जिम मध्ये जाऊन व्यायाम करतं, तर कोणी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतं. पण तरी यामुळे वजन कमी होईलच असे सांगता येत नाही. वजन कमी करण्यासाठी अंडीही फायदेशीर ठरतात. आपण बर्‍याचवेळेला ऐकले असेल जिम मध्ये जाणारे, बॉडी बिल्डर अंडी खात असतात. अंड हे सुपरफूड मानले जाते.

weight loss
वजन कमी करण्यासाठी खा अंडी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात, कोणी जिम मध्ये जाऊन व्यायाम करतं, तर कोणी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतं.
  • पण तरी यामुळे वजन कमी होईलच असे सांगता येत नाही.
  • वजन कमी करण्यासाठी अंडीही फायदेशीर ठरतात.

egg for weight loss : मुंबई :  वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात, कोणी जिम मध्ये जाऊन व्यायाम करतं, तर कोणी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतं. पण तरी यामुळे वजन कमी होईलच असे सांगता येत नाही. वजन कमी करण्यासाठी अंडीही फायदेशीर ठरतात. आपण बर्‍याचवेळेला ऐकले असेल जिम मध्ये जाणारे, बॉडी बिल्डर अंडी खात असतात. अंड हे सुपरफूड मानले जाते. यात प्रोटीन असतं, तसेच विटामिन डी, अमिनो ऍसिड, विटामिन ए, बी १२, रिबाफ्लेविन आणि फोलेट असतं. त्यामुळे शरीर मजबूत होतं. अंड्याचे अनेक पदार्थ बनतात त्यात उकडलेली अंडी, भुर्जी, अंड्याची पोळी अशा अनेक डिशेस आहेत.  परंतु वजन कमी करण्यासाठी फक्त अंडी खाऊन उपयोग नाही, त्यात पुढील पदार्थ टाकल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत होते. जाणून घेऊया अंड्यात कुठले पदार्थ टाकल्यास वजन लवकर कमी होतं. (weight loss tips in marathi egg use in weight loss journey add this food item in diet )

अधिक वाचा : Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे पाळा खाण्याच्या वेळा, झटपट होईल वजन कमी


खोबरेल तेल

अंड बनवताना लोक त्यात मस्का, ऑलिव्ह ऑईल वापरतात. परंतु वजन कमी करण्यासाठी अंड बनवताना खोबरेल तेलाचा वापर केला पाहिजे. कारण खोबरेल तेलात सॅच्युरेटेड फॅट फार कमी असतं. त्यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

अधिक वाचा : Digestion Tips : स्वादिष्ट आहे म्हणून जास्त खाल्ले...आता बिघडले पोट, मग या 5 किचन टिप्सने सांभाळा पचनक्रिया

शिमला मिरची

वजन कमी करण्यासाठी शिमला मिरची फार फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी शिमला मिरचीत पोषक तत्व असतात. जर अंडी आणि शिमला मिरची एकत्र करून खाल्ल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा : Skin Care Tips: मधाची जादू..! चेहऱ्यांवरील डागांपासून व्हा मुक्त आणि मिळवा ग्लोईंग स्किन; असा करा वापर

काळी मिरी

उकडलेली अंडी किंवा अंड्याच्या पोळीत काळी मिरी टाकल्यास अंड आणखी चविष्ठ होतात. इतकेच नाही तर ते आरोग्यासाठीही चांगले असतात. काळी मिरीमुळे पोटातील चरबी कमी होते. जर तुम्हाला अंड्याची पोळी आवडत नसेल तर दररोज दोन उकडलेली अंडी खाऊ शकता. त्यामुळे फार भूक  लागत नाही आणि पुन्हा पुन्हा खाण्याची गरज भासत नाही, तसेच वजनही नियंत्रणात राहतं.

अधिक वाचा : Tomato Fever : वेगाने पसरतोय टोमॅटो फिव्हर, ‘या’ लोकांना जास्त धोका

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे टाइम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी