Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे पाळा खाण्याच्या वेळा, झटपट होईल वजन कमी

बॅलेन्स डाएटमध्ये कार्ब्स, फॅट, प्रोटी आणि फायबर योग्य प्रमाणात असतं. तसेच तुम्ही जो डाएट घेत आहात त्यात न्युट्रिएंट्स मोठ्या प्रमाणात असायला हवे. एका संशोधनानुसार वजन कमी करण्यासाठी खाण्या पिण्याच्या वेळा पाळल्या पाहिजे. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी खाण्या पिण्याच्या वेळा कशा पाळल्या पाहिजे.

weight loss
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुम्ही जो डाएट घेत आहात त्यात न्युट्रिएंट्स मोठ्या प्रमाणात असायला हवे.
  • का संशोधनानुसार वजन कमी करण्यासाठी खाण्या पिण्याच्या वेळा पाळल्या पाहिजे.
  • जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी खाण्या पिण्याच्या वेळा कशा पाळल्या पाहिजे.

Weight loss food eating time : वजन कमी करण्यासाठी लोक काय काय उपाय करतात. वजन वाढू नये म्हणून काही लोक खाणे पिणे बंद करतात. काही लोक सलाड आणि इतर पदार्थ सुरू करतात. डाएटिशननुसार वजन कमी करण्यासाठी अन्न पाणी सोडणे गरजेचे नाही. उलट बॅलेन्स डाएट घेणे गरजेचे आहे. बॅलेन्स डाएटमध्ये कार्ब्स, फॅट, प्रोटी आणि फायबर योग्य प्रमाणात असतं. तसेच तुम्ही जो डाएट घेत आहात त्यात न्युट्रिएंट्स मोठ्या प्रमाणात असायला हवे. एका संशोधनानुसार वजन कमी करण्यासाठी खाण्या पिण्याच्या वेळा पाळल्या पाहिजे. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी खाण्या पिण्याच्या वेळा कशा पाळल्या पाहिजे. (weight loss tips in marathi follow food eating time for better weight loss journey)

अधिक वाचा : Weight Loss Story : लठ्ठपणामुळे गर्लफ्रेंड गेली सोडून, तरुणाने ‘विरहा’त घटवलं 70 किलो वजन

वजन कमी करण्यासाठी कधी खाल्ले पाहिजे ?

काही संशोधनानुसार आणि डाएटिशनुसार जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. संशोधनानुसार जे लोक जेव्हा भूक लागते आणि योग्य आहार घेतात त्यांचे लवकर वजन कमी होते किंवा वजन नियंत्रणात राहतं. 

अधिक वाचा : Diabetes Symptoms : पाय आणि डोळ्यांत दिसतात मधुमेहाची लक्षणं, या संकेतांकडे ठेवा लक्ष

या संशोधनात आठ देशांतील ६ हजारहून अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यांना विचारलेल्या प्रश्नांसोबत त्यांचे वजन आणि बॉडी मास इंडेक्सही तपासले गेले होते. संशोधनात जेवण्याची पद्धत तीन प्रकारे तपासली गेली. त्यात भूक लागण्यावर खाणे, इमोशनल होऊन खाणे आणि कमी खाणे अशा प्रकारांचा समावेश होता.

अधिक वाचा : Running Tips : वजन कमी करण्यासाठी धावत असाल तर जाणून घ्या योग्य पद्धत, टळेल नुकसान

जर कुणावर ताण असेल आणि उदास असेल तर ती व्यक्ती इमोशनल इटिंग करत आहे. जर कोणी कॅलरी मोजून खात असेल तर ती व्यक्ती स्ट्रिक्ट इटिंग करत आहे. संशोधनाच्या विश्लेषणात असे आढळले की जे लोक भूक लागल्यावर खातात त्यांचे वजन लवकर कमी होते किंवा नियंत्रणात राहतं. तसेच त्यांची मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगलं असतं.

अधिक वाचा : Health: गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

डाएटिंग करणे कमी फायदेशीर

अमेरिकेच्या रटगर्ट विद्यापीठाचे संशोधक डॉ. चार्लोट मार्के यांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोक सल्ला देतात की वजन कमी करण्यासाठी कमी खाल्ले पाहिजे. परंतु ही बाब चुकीची आहे. जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही खाल्ले पाहिजे, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. डाएटिंगमुळे कधी कधी उलट परिणाम होऊ शकतात. सर्व नवे ट्रेंड्स सोडून जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा खाल्ले पाहिजे, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल असे डॉ. मार्के म्हणतात.

अधिक वाचा : Weight Loss : वजन कमी करण्यासाठी 'या' वेळेत करा जेवण, फटाफट होईल वेटलॉस!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी