Weight Loss Marathi Tips : वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या चार सोप्या टिप्स आणि पहा फरक

अनेक वेळेला वजन कमी करण्यासाठी लोक औषंधही घेण्यास सुरूवात करतात. त्यामुळेही वजन कमी होतंच असं नाही. वाढलेल्या वजनामुळे आणखी ताण येण्याची शक्यता आहे. पण वजन कमी करणे इतकेही कठीण आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये काही योग्य बदल करणे गरजेचे आहे. पुढील काही टिप्स फॉलो करा त्यामुळे पोटातील चरबी कमी होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल. 

weight loss tips marathi
वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या चार सोप्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अनेक वेळेला वजन कमी करण्यासाठी लोक औषंधही घेण्यास सुरूवात करतात
  • पण वजन कमी करणे इतकेही कठीण आहे.
  • पुढील काही टिप्स फॉलो करा त्यामुळे पोटातील चरबी कमी होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल. 

Weight Loss Tips: मुंबई : सध्या लठ्ठपणाची समस्या सगळ्यांना जाणवत आहे. अनेक वेळेला वजन नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे अनेक व्याधी शरीराला होतात. त्यामुळे वेळीच वजन कमी करणे किंवा नियंत्रित करणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी लोक नाना तर्‍हेचे उपाय करतात. वजन कमी करण्यासाठी कुणी धावायला जातं, कुणी डाएट प्लॅन सुरू करतं, कुणी जिममध्ये तासनतास व्यायाम करून घाम गाळतात. परंतु असे केल्याने योग्य तो रिझल्ट मिळतोच असे नाही. त्याचे कारण बर्‍याच वेळेला आपण वजन कमी करण्यासाठी या गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतो. 

अनेक वेळेला वजन कमी करण्यासाठी लोक औषंधही घेण्यास सुरूवात करतात. त्यामुळेही वजन कमी होतंच असं नाही. वाढलेल्या वजनामुळे आणखी ताण येण्याची शक्यता आहे. पण वजन कमी करणे इतकेही कठीण आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये काही योग्य बदल करणे गरजेचे आहे. पुढील काही टिप्स फॉलो करा त्यामुळे पोटातील चरबी कमी होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल. 


हेल्दी डाएट

can vegetarian loose weight faster, benefits of vegetarian, benefits of vegetarian diet, how to lose weight if you are a vegetarian, vegetarian food, vegetarian fruits, vegetarian diet, study of vegetarian, how vegetarian lose weight faster, vegetarian di

चविष्ट पदार्थ खाताता आरोग्याला फायदेशीर असेही पदार्थही आपण खाल्ले पाहिजे. तर वजन कमी होण्यास मदत होईल. तसेच कितीही योगा किंवा व्यायाम केला तरी योग्य आहार किंवा डाएट नसेल तर योगा आणि व्यायामाचा फायदा होणार नाही. यासाठी आहारात लो फॅट पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. आहार फायबार, मिनरल्स, विटॅमिन्स आणि प्रोटीन असलेल्या हिरव्या भाज्या अहार असणे गरजेचे आहे. 

व्यायाम करा

Bodybuilding Tips
शरीराचे वजन वाढत असेल तर लगेच व्यायाम करण्यास सुरूवात करा. खरंतर हेल्दी राहण्यासाठी सगळ्यांनीच व्यायाम करणे गरजेचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. दररोज सकाळी २० ते २५ मिनिटे व्यायाम करावा. त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. 


जेवण टाळू नका

Take care of food in Navratri

वजन वाढल्यानंतर अनेकांना वाटते की जास्त खाल्ल्यामुळे वजन वाढत आहे. त्यामुळे अनेकजण खाण्याचे टाळतात किंवा खाणे कमी करतात. पण असे करणे चुकीचे आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच रिकाम्या पोटी  व्यायाम केल्यास शरीरासाठी हानीकारक असू शकतं. त्यामुळे सकाळी  आवर्जून नाष्टा करावा. नाष्ट्यात सलाड, फळं, ज्युसचा समावेश करावा. 


कोमट पाणी प्या 

these five habits to stay healthy keep diseases away

शरीरातील पचनशक्ती चांगली होण्यासाठी सकाळी कोमट पाणी प्यावे. सकाळी दोन ग्लास पाण्यात लिंबाचा रस घालून हे लिंबू पाणी प्यावे. यामुळे शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर पडतात. कोमट पाण्यामुळे शरीरातील फॅट सेल्स बर्न होतात. जेवणापूर्वी कोमट पाणी जरू प्या, यामुळे कॅलरी इनटेक नियंत्रित होते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी