Weight Loss tips in Marathi: वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हे पाच नियम आणि पहा फरक

वजन कमी करण्यासाठी लोक खुप सारे उपाय करतात. जिममध्ये जाऊन घाम गाळून व्यायाम करतात, कोणी सकाळी सकाळी धावायला जातात तर काही लोक स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. त्यानंतरही काही लोकांचे वजन कमी होत नाही. यासाठी काही नियम फॉलो करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी काय नियम पाळावेत.

weight loss tips in marathi
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी लोक खुप सारे उपाय करतात.
  • त्यानंतरही काही लोकांचे वजन कमी होत नाही.
  • यासाठी काही नियम फॉलो करणे गरजेचे आहे.

Weight Loss tips in Marathi:   वजन कमी (weight loss) करण्यासाठी लोक खुप सारे उपाय करतात. जिममध्ये (gym workout) जाऊन घाम गाळून व्यायाम करतात, कोणी सकाळी सकाळी धावायला (morning) जातात तर काही लोक स्ट्रिक्ट डाएट (strict diet) फॉलो करतात. त्यानंतरही काही लोकांचे वजन कमी होत नाही. यासाठी काही नियम फॉलो करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी काय नियम पाळावेत.

अधिक वाचा : Weight Loss Tips in Marathi : वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये आहे फरक, तुमचीही गल्लत होत नाहिये ना ?

1. सकाळी सकाळी प्या लिंबू पाणी

वजन कमी करण्यासाठी सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी लिंबू पाणी प्या. लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहतं तसेच वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही लिंबू पाण्यात मधही घालू शकता. रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

अधिक वाचा :  matki : सेक्स पॉवर वाढविणारे आणि आरोग्यासाठी संजीवनी असलेले कडधान्य

 

2. दुधी भोपळ्याचा रस

दुधी भोपळ्यात खुप सारे औषधी गुण असतात. दुधी भोपळ्याचा रस घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. दुधी भोपळ्यात विटामिन, खनिज, फायबर आणि अँटीऑक्सिडेंट गुण असतात, त्यामुळे शरीर स्वस्थ राहतं. 

अधिक वाचा : Weight loss Tips in Marathi  : पनीर आणि अंड्यामुळे वजन कमी होतं? जाणून घ्या सविस्तर
 

3. जेवणापूर्वी सलाड खा

जेवणापूर्वी सलाड खाल्यास भुकेवर नियंत्रण मिळवता येतं. तसेच शरीरात फार कॅलरी जमा होत नाहीत. जेवणापूर्वी सलाद खाल्ल्याने वजन लवकर कमी होतं. सलादमध्ये मिनरल्स, विटामिन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यामुळे पचनशक्ती चांगली होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा : Unhealthy food items : पावसाळ्यात हे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा चेहऱ्यावर उठतील पिंपल्स


4. रात्री डाळ चपाती टाळा

वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट घेणे गरजेचे आहे. एका दिवसात किती चपात्या आणि किती भात खाल्ला पाहिजे यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दिवसा चपाती खावी तर रात्रीच्या जेवणात चपाती टाळावी. रात्री चपाती खाल्ल्याने पचशक्ती बिघडू शकते. रात्री चपाती आणि डाळ खाल्याने अस्वस्थ वाटू शकतं आणि त्यामुळे झोपेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रात्री जेवताना जर तुम्ही फक्त भात खात असाल तर फक्त भात खा तेव्हा चपाती खाऊ नका. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जेवल्यास चांगले असते. 

अधिक वाचा :  Weight Loss Tips: पोटाची चरबी कमी करण्याचं आलंय टेन्शन?, चिंता नको फक्त रात्री झोपण्यापूर्वी खा 'हे' 4 पदार्थ

5. जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या

काही लोकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते. जेवताना पाणी प्यायल्यास तब्येत बिघडण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे वजनही वाढू शकतं. जेवल्यानंतर एक तासानंतर पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते तसेच पचनशक्ती सुधारते.

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी