Weight Loss Tips in Marathi : वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये आहे फरक, तुमचीही गल्लत होत नाहिये ना ?

स्लिम होण्यासाठी वेट लॉसपेक्षा फॅट लॉस करणे गरजेचे आहे. वेट लॉसमुळे एखादी व्यक्ती जरून स्लिम ट्रिम दिसते. परंतु त्यामुळे अनेक व्याधीही समोर येतात. फॅट लॉस केल्यामुळे एखादी व्यक्ती फिट दिसते. वजन कमी करण्यासाठी फॅट कमी करणे गरजेचे आहे.

weight loss tips in marathi
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्लिम होण्यासाठी वेट लॉसपेक्षा फॅट लॉस करणे गरजेचे आहे.
  • वेट लॉसमुळे एखादी व्यक्ती जरून स्लिम ट्रिम दिसते. परंतु त्यामुळे अनेक व्याधीही समोर येतात.
  • वजन कमी करण्यासाठी फॅट कमी करणे गरजेचे आहे.

Weight Loss And Fat Loss:  लोक वजन कमी करताना वेट लॉस (Weight loss) आणि फॅट लॉसमध्ये (fat loss) गल्लत करतात. वेट लॉस आणि फॅट लॉसमुळे शरीत सडपातळ (slim body) होण्यास मदत होते. असे असले तरी या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. वेट लॉस आणि फॅट लॉस बाबत लोक गोंधळलेले असतात. स्लिम होण्यासाठी वेट लॉसपेक्षा फॅट लॉस करणे गरजेचे आहे. वेट लॉसमुळे एखादी व्यक्ती जरुर स्लिम ट्रिम दिसते. परंतु त्यामुळे अनेक व्याधीही समोर येतात. फॅट लॉस केल्यामुळे एखादी व्यक्ती फिट (fit) दिसते. वजन कमी करण्यासाठी फॅट कमी करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया फॅट लॉस आणि वेट लॉसमध्ये काय फरक आहे ? (weight loss tips in marathi know difference between weight loss and fat loss )

अधिक वाचा : Weight Loss Tips: पोटाची चरबी कमी करण्याचं आलंय टेन्शन?, चिंता नको फक्त रात्री झोपण्यापूर्वी खा 'हे' 4 पदार्थ

वेट लॉस म्हणजे काय?

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वेट लॉस करणे म्हणजे शरीरातील मसल्स, फॅट आणि पाण्याचे वजन कमी करणे. शरीरासाठी मसल्स गरजेचे असतात त्यामुळे शरीत हेल्दी राहतं. क्रॅश डाएट आणि ग्लुटेन फ्री डाएटमुळे शरीराचे वजन कमी होतं परंतु शरीरासाठी गरजेचे असलेले मसल्सही निघून जातात. साधे डाएट करताना शरीराचे पुन्हा वजन वाढते. स्लिम बॉडीसाठी वेट लॉस नव्हे तर फॅट लॉस करणे गरजेचे आहे.

अधिक वाचा : Weight Loss Tips : अधूनमधून उपवास करताना या चुका कराल तर वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची असते शक्यता

फॅट लॉस म्हणजे काय?

शरीरातील लीन मास बर्न करून जे मसल्स तुम्ही गेन करता त्याला फॅट लॉस म्हणतात. यात शरीरातील  जमा झालेले फॅट बर्न केले जातात. त्याला चरबीही म्हणतात. कॅलरी डेफिसिट आणि व्यायामामुळे शरीरातील नको असलेली चरबी वितळते. प्रत्येकाच्या शरीरात वेगळी बॉडी फॅट असते. हे फॅट कमी करण्यासाठीए प्रत्येक जण प्रयत्न करतो. हेल्दी शरीरासाठी एक्स्ट्रा बॉडी फॅट कमी करणे गरजेचे आहे, त्यासाठी शरीराचे वजन कमी करण्याची गरज नाही.

अधिक वाचा : Yoga For Back Fat: चरबी कमी करण्याचा प्रभावी मार्ग, फक्त करा ही आसनं

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

अधिक वाचा : Weight loss Tips in Marathi  : पनीर आणि अंड्यामुळे वजन कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी