Weight Loss Tips: काय सांगता ! Liquid Diet केल्यानं सहज कमी होते वजन, फक्त जाणून घ्या हा फॉर्म्युला

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Sep 06, 2022 | 08:57 IST

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी काही लोक व्यायाम करतात, डाएट प्लॅन बनवतात, योगा करतात. पण काही वेळा सगळं करूनही वजन कमी करणं कठीण होऊन बसतं. तुम्ही वजन कमी करण्यासाठी बरेच फॉर्मूले ट्राय केले असतील.

Liquid Diet For Weight Loss
वजन कमी करण्याच्या टीप्स 
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी काही लोक व्यायाम करतात, डाएट प्लॅन बनवतात, योगा करतात.
  • वजन कमी करण्यासाठी बरेच फॉर्मूले ट्राय केले जातात.
  • तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारात फक्त पातळ पदार्थांचे सेवन करावे लागेल.

मुंबई: Liquid Diet For Weight Loss: वजन कमी करणं हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकंच ते कमी करणं  (Losing weight)अवघड आहे. वजन कमी करण्यासाठी काही लोक व्यायाम करतात, डाएट प्लॅन बनवतात, योगा करतात. पण काही वेळा सगळं करूनही वजन कमी करणं कठीण होऊन बसतं. तुम्ही वजन कमी करण्यासाठी बरेच फॉर्मूले ट्राय केले असतील. मात्र त्यापैकी बहुतेक प्रयत्न अयशस्वी ठरले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला आणखी एक फॉर्मूला सांगणार आहोत. जर तुम्हाला हेल्दी खाऊन जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही लिक्विड डाएट ट्राय करू शकता. (Weight Loss Tips in marathi Liquid Diet Formula)

वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट खूप फायदेशीर ठरतो. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट

लिक्विड डाएट काय आहे

नावाप्रमाणे लिक्विड डाएटचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारात फक्त पातळ पदार्थांचे सेवन करावे लागेल. लिक्विड डाएट दरम्यान घन पदार्थ खाण्यास मनाई आहे. लिक्विड डाएट दरम्यान, पचनसंस्थेच्या प्रक्रियेवर फारच कमी दबाव असतो. तणाव कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरते.

अधिक वाचा-  Amit Shah Visit : शिवसेनेने लगावला अमित शहांच्या दौऱ्यावरून भाजपला टोला

वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट उपयुक्त का आहे? 

दरम्यान कोणत्याही प्रकारच्या लिक्विड डाएटमधील कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असल्याचे आढळून येते. कमी कॅलरीजचे सेवन वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. जास्त काळ वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएटचा अवलंब करू नये. कारण जेव्हा कॅलरीज कमी होतात तेव्हा ऊर्जा वाचवण्यासाठी चयापचय मंदावतो. जर तुम्ही दीर्घकाळ लिक्विड डाएटचे पालन केले आणि अचानक ते बंद केले आणि वजन पुन्हा वाढू लागले.

लिक्विड डाएट कधी घ्यावा?

वजन कमी करण्यासाठी 2 ते 3 आठवडे लिक्विड डाएटचे पालन केले जाऊ शकते. मात्र यापेक्षा जास्त काळ लिक्विड डाएट घेतल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. 

ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांना लिक्विड डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. द्रव आहारादरम्यान, अन्न चघळण्याची आणि गिळण्याची कोणतीही समस्या नसते, त्यामुळे ते सहज पचते.

तुमच्या पोटाचे आणि आतड्यांचे आतील भाग पाहण्यासाठी चाचणी किंवा इमेजिंग प्रक्रियेची तयारी करताना, तुम्हाला प्रक्रियेपूर्वी एक किंवा दोन दिवस लिक्विड डाएट घेण्यास सांगितले जाऊ शकते.

लिक्विड डाएटचे पालन करून वजन कमी करू शकतो का?

आहारतज्ञ म्हणतात की द्रव आहारामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. दरम्यान ते फार वेळासाठी फॉलो करू नये. जर तुम्ही दीर्घकाळ लिक्विड डाएटचे पालन केले तर शरीरात अशक्तपणा, डोकेदुखी आणि अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी