Weight loss Tips in Marathi  : पनीर आणि अंड्यामुळे वजन कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात. कुणी धावायलं जातं, कुणी जिममध्ये तानसनतास घाम गाळून व्यायाम करतात. तर काही जण स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. त्यानंतरही वजन कमी होतंच असे नाही. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नव्हे तर योग्य डाएट घेणेही गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी लोक पनीर आणि अंड्याचे सेवन करततात. पनीर आणि अंड्यामध्ये कॅलरी कमी असतात तसेच मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं.

weight loss tips in marathi
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नव्हे तर योग्य डाएट घेणेही गरजेचे आहे.
  • वजन कमी करण्यासाठी लोक पनीर आणि अंड्याचे सेवन करततात.
  • पनीर आणि अंड्यामध्ये कॅलरी कमी असतात तसेच मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं.

Weight loss Tips in Marathi  :  वजन कमी (Weight loss) करण्यासाठी लोक काय काय करतात. कुणी धावायलं जातं, कुणी जिममध्ये (Gym) तानसनतास घाम गाळून व्यायाम (Workout) करतात. तर काही जण स्ट्रिक्ट डाएट (Strict Diet) फॉलो करतात. त्यानंतरही वजन कमी होतंच असे नाही. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नव्हे तर योग्य डाएट घेणेही गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी लोक पनीर (paneer) आणि अंड्याचे (egg) सेवन करततात. पनीर आणि अंड्यामध्ये कॅलरी (calories) कमी असतात तसेच मोठ्या प्रमाणात प्रोटीन (protein) असतं. प्रोटीन पचायला वेळ लागतं तसेच वजन कमी होण्यासही मदत होते. त्याशिवाय हे पदार्थ खाल्ल्यामुखे फार वेळ भूक लागत नाही. पण अंडी आणि पनीर खाल्ल्यामुळे खरंच वचन कमी होतं का? जाणून घेऊया.  (weight loss tips in marathi paneer and egg useful for weight loss journey)

अधिक वाचा : Weight Loss Tips: पोटाची चरबी कमी करण्याचं आलंय टेन्शन?, चिंता नको फक्त रात्री झोपण्यापूर्वी खा 'हे' 4 पदार्थ

पनीरमुळे कसे होते वजन कमी

पनीरमुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते. यामुळे शरीराला दररोज लागणारी ऊर्जा मिळाते. परंतु पनीरच्या चविष्ठ पदार्थांमुळे वजन वाढतं. पनीरमध्ये तेल आणि मसाले टाकलेले पदार्थ वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. वजन कमी करण्यासाठी पनीर टिक्का सारखे पदार्थ फायदेशीर ठरतं. एका दिवसांत जास्त पनीर खाणे नुकसानदायक आहे. 

अधिक वाचा :  Weight Loss Tips : अधूनमधून उपवास करताना या चुका कराल तर वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची असते शक्यता


अंड्यामुळे होतं वजन कमी

अंड्यामुळे शरीराला फायदाच होतो. अंड्यामुळे शरीरातील एमिनो ऍसिडचे प्रमाण योग्य राहतं. अंड्यामुळे पचनशक्ती मजबूत होते तर वजन कमी होण्यासही मदत होते. अंड्यामुळे कंबरेवरील आणि पोटाच्या जवळील चरबी कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा :  Diet to Lose Weight: वजन झपाट्याने कमी करण्यासाठी या गोष्टींचा करा आहारात समावेश

एकाच वेळी पनीर आणि अंडे खाल्ल्यास फायदा होतो  ?

वजन कमी करण्यासाठी प्रोटीन असलेले अंड आणि पनीर फायदेशीर ठरतं. तसेच वजन आणि पनीरमुळे मसल्सही स्ट्रॉंग होतात. आहारतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ योग्य आहेत. प्रोटीन हळू हळू पचंत.  तसेच पोट खुप वेळ भरलेलं राहतं. अंड आणि पनीर एकाच वेळी खाल्ल्यामुळे कुठलेही शारिरीक नुकसान होत नाही. असे असले तरी अंड आणि पनीर योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. 

अधिक वाचा : Weight loss tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी वापरा जिरा आणि पहा फरक

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी