Salad For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. डाएट फॉलो केल्यानंतरही अनेक जणांना अपेक्षित रिझल्ट्स मिळत नाही. बर्याच वेळेला लोक डाएट फॉलो करताना आहारात गरजेचे पोषक पदार्थांचा समावेश करत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईलही परंतु त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि थकवा जाणवतो. त्यामुळे आहारात सर्व पोषक पदार्थ असले पाहिजे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेलच तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. अशा वेळी आपण आहारात प्रोटीन असलेले सलाड खाल्ले पाहिजे.
अधिक वाचा : Aluminum Foil Tips : अॅल्युमिनियम फॉइल अनेक वेदनांमध्ये असणे गुणकारी, असा करा वापर
वजन कमी करण्यासाठी या सलाडचा करा आहारात समावेश
चणे आणि पालक असलेल्या सलाडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतत. चण्यात प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जिंक, आयर्न, विटामिन ए असतं. चणे आणि पालकाच्या सलाडमुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत तुमची ऊर्जा कमी होत नाही. चणे आणि पालकच्या सलाडमध्ये आधी चणे उकडोन घ्या त्यात पुदीना, मसाला, कांदा, टोमॅटो आणि लिंबू पिळू शकता. या सलाडमध्ये पालक उकडून टाका. हे सर्व एकत्र करा आणि हे सलाड खा, त्यामुळे नक्कीच वजन कमी होतं.
काबुली चण्याचे छोले अनेकांना आवडतात. काबुली चण्यापासून इतर भाज्याही बनतात. वजन कमी करण्यासाठी काबुली चण्याचे सलाड आवर्जून खाल्ले पाहिजे. त्यात मोठ्य प्रमाणात फायबर असतं. काबुली चणे हे हाडं आणि पचनशक्तीसाठी चांगलं असत. हे सलाड बनवण्यासाठी काबुली चणे उकडून घ्या त्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची तसेच कोथंबीर आणि चाट मसाला चवीनुसार टाका. हे सलाड तुम्ही सकाळी आणि रात्रीही खाऊ शकता.
(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यत आली आहे. आहार घेण्यापूर्वी एकदा तज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
अधिक वाचा : Liver Health : दारु आणि सिगरेटप्रमाणे ‘या’ गोष्टींमुळेही खराब होतं यकृत, वाचा सविस्तर