Weight Loss: स्विमिंग करून करा वजन कमी, एका तासात होत्यात एवढ्या कॅलरी बर्न

वजन कमी करण्यासाठी स्विमिंगही फायदेशीर आहे. पोहल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पोहल्यामुळे शरीरातील कॅलरी लवकर बर्न होतात. जर तुम्हाला कार्डिओ एक्सरसाईज कंटाळवाणी वाटत असेल तर तुम्ही आवर्जून स्विमिंग केली पाहिजे.

swimming for weight loss
वजन कमी करण्यासाठी करा स्विमिंग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी स्विमिंगही फायदेशीर आहे
  • पोहल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
  • पोहल्यामुळे शरीरातील कॅलरी लवकर बर्न होतात.

Swimming To Lose Weight:  वजन कमी (weight loss) करण्यासाठी लोक काय काय करतात. कोणी धावायला (morning walk) जातं, कोणी जिममध्ये (gym workout) तासनातास घाम गाळून व्यायाम करतात तर कोणी डाएट फॉलो (diet for weight loss) करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. असे असले तरी वजन कमी करण्यात प्रत्येकाला यश मिळेलच असे नाही. वजन कमी करण्यासाठी स्विमिंगही फायदेशीर आहे. पोहल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पोहल्यामुळे लवकर शरीरातील कॅलरी बर्न होतात. जर तुम्हाला कार्डिओ एक्सरसाईज कंटाळवाणी वाटत असेल तर तुम्ही आवर्जून स्विमिंग केली पाहिजे.  (weight loss tips in marathi swimming can burn calories faster says expert )

Weight Loss Tips in Marathi : वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये आहे फरक, तुमचीही गल्लत होत नाहिये ना ?

स्विमिंग केल्यामुळे किती कॅलरी बर्न होते?

जर तुम्ही एक तास स्विमिंग केली तर तुमच्या शरीरातील ४०० कॅलरी बर्न होतात. स्विमिंग एक चांगला कार्डियो एक्सरसाईज आहे. त्यामुळे हार्ट मसल्स आणखी मजबूत होतात आणि शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो.

Weight loss Tips in Marathi : पनीर आणि अंड्यामुळे वजन कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

स्विमिंग करण्याचे फायदे

  1. स्विमिंगमुळे फुफ्फुसं चांगली होतात, त्यामुळे श्वसनप्रक्रिया सुधारते.
  2. पोहल्याने हाडं मजबूत होतात, पोहलामुळे बोन मिनरल डेंसिटी चांगली होते.
  3. पोहल्यामुळे शरीर फिट होतं. पोहल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो. कोलेस्ट्रॉल कमी होतो.  
  4. दररोज स्विमिंग केल्यामुळे तुमचे शरीर चांगलं काम करतं आणि रात्री चांगली झोप लागते.
  5. जे लोक दररोज स्विमिंग करतात त्यांना हृदय विकाराचे आजार आणि मधुमेहाचा धोका नसतो.  

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहिती दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापोरोवी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Weight Loss Tips : अधूनमधून उपवास करताना या चुका कराल तर वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची असते शक्यता

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी