10,000 Steps Workout: वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाने १० हजार पावलं चाललं पाहिजे? जाणून घ्या सत्य

दररोज १० हजार पावलं चालल्यास वजन कमी होतं का? कुणी तुम्हाला चालल्यानंतर वजन कमी होतं असे सांगितल्या तुम्हालाही प्रश्न पडला असेल. वजन कमी करण्यासाठी चालणेही फायदेशीर आहे. चालणे हा एक इफेक्टिव एक्सरसाईज आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा व्यायाम करू शकतो. चालण्यासाठी कुठलेही विशिष्ट स्पीडची गरज नाही.

walking
चालण्याचे फायदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दररोज १० हजार पावलं चालल्यास वजन कमी होतं का? कुणी तुम्हाला चालल्यानंतर वजन कमी होतं असे सांगितल्या तुम्हालाही प्रश्न पडला असेल.
  • वजन कमी करण्यासाठी चालणेही फायदेशीर आहे.
  • चालणे हा एक इफेक्टिव एक्सरसाईज आहे.

Ten Thousand Steps : मुंबई : दररोज १० हजार पावलं चालल्यास वजन कमी होतं का? कुणी तुम्हाला चालल्यानंतर वजन कमी होतं असे सांगितल्या तुम्हालाही प्रश्न पडला असेल. वजन कमी करण्यासाठी चालणेही फायदेशीर आहे. चालणे हा एक इफेक्टिव एक्सरसाईज आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा व्यायाम करू शकतो. चालण्यासाठी कुठलेही विशिष्ट स्पीडची गरज नाही. तुम्ही आपल्या गार्डनमध्ये पार्कात किंवा रस्त्यावर चालू शकता. परंतु नेमकी किती पावलं चालली पाहिजे याबद्दल एकमत नाही. दिवसाला १० हजार पावलं चालली पाहिजे असे सांगितले जाते. यात किती तथ्य आहे जाणू घेऊया. (weight loss tips in marathi ten thousand steps for weight loss fact check )

अधिक वाचा : Office Tips: जेव्हा ऑफिसमध्ये आळस येतो तेव्हा लगेच करा ही गोष्ट, झोप होईल गायब

चालण्याचे फायदे

दररोज चालल्यामुळे हृदरोगाचा धोका, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजारांचा धोका कमी होतो. तसेच हाडांचे आरोग्य चांगल होतं. सकाळी सकाळी चालल्यास शरीराला विटामिन डी मिळतं. तसेच ताण कमी होतो आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते.   

अधिक वाचा : Corona Prevention : ताप आल्यावर औषधं तर घ्याच, पण ‘हे’ सुद्धा करा! सर्वांनाच होईल फायदा

१० हजार पावलांमुळे वजन कमी होतं?

दररोज १० हजार पावलं चालल्यामुळे वजन कमी होतं असे सांगितले जाते. सध्याच्या काळात आपली शारिरीक हालचाल कमी झाली आहे. लोक घरच्या घरी व्यायाम करतात, पण त्यांचे फार चालणे होत नाही. अनेकजण १० हजार पावलं चालण्याचा लक्ष्य ठरवतात आणि १००पावलं चालल्यानंतर थकून जातात. काही लोकांना वाटतं की चालल्यामुळे वजन कमी होत नाही म्हणून ते लोक फार चालत नाहीत. तसेच चालल्यामुळे लगेच वजन कमी होत नाही त्यामुळे लोक चालण्याचे टाळतात. काही लोकांची क्षमता कमी असते तरी ते १० हजार पावलं चालण्याचा अट्टाहास करतात. प्रत्येकाने १० हजार पावलांचा व्यायाम केलाच पाहिजे का? तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण प्रत्येकाची शारिरीक क्षमता वेगळी असते. चालण्याची क्षमता प्रत्येकाचे वय, अरोग्य आणि मेडिकल इश्युशी संबंधित असते. ज्यांन काही आजार असेल त्यांनी दहा हजार पावलं चालणे धोकादायक आहे. म्हणून कुठलाही व्यायाम करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

अधिक वाचा : Psoriasis : सोरायसिसच्या रुग्णांनी ‘हे’ पदार्थ कधीच खाऊ नयेत, त्रास होईल दुप्पट

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)​

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी