एका दिवसांत एक किलो वजन कमी करणारा डाएट प्लॅन

weight loss tips lose 1 kg in 1 day follow this routine try this very effective diet plan : एका दिवसांत एक किलो वजन कमी करणे शक्य आहे. डाएट प्लॅनचे व्यवस्थित पालन करणे आवश्यक आहे.

weight loss tips lose 1 kg in 1 day follow this routine try this very effective diet plan
एका दिवसांत एक किलो वजन कमी करणारा डाएट प्लॅन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • एका दिवसांत एक किलो वजन कमी करणारा डाएट प्लॅन
 • डाएट प्लॅनचे व्यवस्थित पालन करणे आवश्यक
 • डाएट प्लॅनचे पालन करण्याआधी वैद्यकीय सल्ला जरुर घ्या

weight loss tips lose 1 kg in 1 day follow this routine try this very effective diet plan : सध्याच्या वेगवान आयुष्यात वाढलेले वजन ही एक गंभीर समस्या झाली आहे. या समस्येवर एक रामबाण उपाय आहे. आता एका दिवसांत एक किलो वजन कमी करणे शक्य आहे. जर हा रामबाण उपाय करायचा असेल तर डाएट प्लॅनचे व्यवस्थित पालन करणे आवश्यक आहे. हा डाएट प्लॅन वेगवेगळ्या डाएट प्लॅनच्या चांगल्या वाईट परिणामांच्या अभ्यासातून तयार करण्यात आल आहे. पण या डाएट प्लॅनचे पालन करण्याआधी वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय वजन कमी करण्यासाठी स्वतःच्या मर्जीने डाएट करणे टाळा. । तब्येत पाणी । आरोग्य

ओठांच्या वरील भागात येणाऱ्या केसांमुळे लाजू नका; घरबसल्या करा हे घरगुती उपाय

तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे ८ सोपे उपाय

रात्री झोप येत नाही मग करा ही सोपी कृती

Belly Fat कमी करण्यासाठी घरातील या चार गोष्टी करतील मदत

 1. साखर बंद : कोणत्याही प्रकारे साखर खाणे टाळा. मिठाई खाणे बंद करा. साखर तसेच गोड पदार्थ पचण्यासाठी वेळ लागतो. यामुळे साखर आणि गोड पदार्थ खाणे बंद करा.
 2. मीठ चवीपुरते घ्या : भाजीत चवीपुरते मीठ असते तेवढे चालेल पण एरवी मीठ खाणे बंद करा. कोणत्याही पदार्थावर वरून मीठ घेणे बंद करा. 
 3. मैदा आणि तांदूळ खाणे बंद करा : मैदा आणि तांदूळ हे पदार्थ पचण्यासाठी वेळ लागतो. यामुळे मैद्यापासून तयार केलेले पदार्थ आणि बेकरीतले पदार्थ तसेच तांदळापासून तयार केलेले पदार्थ (भात) खाणे बंद करा.
 4. तेलकट आणि तुपकट पदार्थ खाणे बंद करा : तेलकट आणि तुपकट पदार्थ खाणे बंद करा
 5. एक ग्लास दूध किंवा एक कप ग्रीन टी : चहा किंवा कॉफी पिणे टाळा. दररोज सकाळी एक ग्लास दूध प्या अथवा एक कप ग्रीन टी प्या. 
 6. नाश्ता : दररोज पोटभर नाश्ता करा. नाश्ता करताना ताजी फळे खाण्यावर भर द्या.
 7. सॅलड : दररोज नाश्ता करण्याआधी तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाआधी एक काकडी, एक टोमॅटो, एक बीट, एक गाजर चावून खा.
 8. दुपारचे जेवण : दुपारच्या जेवणात प्रथिनांवर अर्थात प्रोटिन्सवर भर द्या. डाळींपासून तयार केलेले पदार्थ अर्थात वरण किंवा आमटी आणि ताज्या भाज्या खाण्यावर भर द्या. जेवणानंतर एक ग्लास ताक प्या अथवा एक वाटी दही खा.
 9. रात्रीचे जेवण : डाळींपासून तयार केलेले पदार्थ अर्थात वरण किंवा आमटी आणि ताज्या भाज्या खाण्यावर भर द्या.
 10. गरम पाणी : दिवसभरात किमान तीन लिटर गरम पाणी प्या. यामुळे शरीर डीटॉक्स होण्यास मदत होईल. शरीरातील विषद्रव्ये वेगाने बाहेर टाकली जातील. 
 11. व्यायाम : दररोज किमान अर्धा तास वा एक तास व्यायाम करा. व्यायाम करणे शक्य नसल्यास दररोज किमान अर्धा तास वा एक तास वेगाने चालणे अथवा वेगाने धावणे (जॉगिंग) असा व्यायाम करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी