Weight loss Tips: वजन कमी करण्यासाठी रोज खा चपाती आणि भात 

तब्येत पाणी
Updated Apr 19, 2019 | 20:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

चपाती भात अशा दोन गोष्टी आहेत ज्या भारतीय थाळीचा महत्त्वाचा हिस्सा आहे. या दोन्ही पदार्थांशिवाय कोणतीही थाळी पूर्ण होऊ शकतं नाही. मात्र वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ किती महत्त्वाचे आहेत हे जाणून घेऊया.

Weight loss foods
वजन कमी करण्यासाठी खा नियमित आहारातल्या या गोष्टी  |  फोटो सौजन्य: Instagram

Weight loss tips With diet plan: जेव्हाही वजन कमी करण्यावर बातचीत सुरू होते तेव्हा पहिल्यांदा ताटातून चपाती आणि भात पूर्णपणे हटवण्याचं बोललं जातं. कारण या दोन्ही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असते. जास्तकरून भारतीय पदार्थ हे कार्बोहायड्रेट्सनी भरलेलं असतं. मात्र यात प्रोटीनचं प्रमाण खूप कमी असते. याच कारणामुळे वजन कमी करण्यासाठी पहिल्यांदा भारतीय जेवणातून कार्बोहायड्रेट्सनं भरलेलं भात आणि चपाती काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. कारण वजन कमी करण्यासाठी प्रोटीनचं इंटेक वाढवणं महत्त्वाचं आहे. 

वेट लॉस डाएट प्लानमध्ये लो कार्ब्स डाएट स्ट्रिक्ली फॉलो करावं लागतं. मात्र सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, तुमच्या डाएट प्लानमध्ये चपाती आणि भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही आहे. मात्र ती खाण्याच्या मर्यादेत थोडे बदल करावे लागतील. 
चला तर मग जाणून घेऊया चपाती आणि भात वेट लॉस डाएट प्लानचा हिस्सा असावा कि नाही आणि त्याचे प्रमाण किती असावं. 

weight lose tips

भात खावं की चपाती, वेट लॉससाठी काय आहे चांगलं 

चपातीमधलं न्यूट्रिशन व्हॅल्यू 

चपातीमध्ये पूर्णपणे कार्बोहायड्रेट्स नसतात. यात अनेक प्रकारचे मायक्रो न्यूट्रीएंट्ससोबत प्रोटीन आणि फायबर देखील असतात. एक सहा इंचाची चपातीमध्ये जवळपास १५ ग्रॅम कार्ब्स, तीन ग्रॅम प्रोटीन आणि 0.4 ग्रॅम फॅट असतं. एका चपातीमधून ७१ कॅलेरीज मिळतात. 

भाताची न्यूट्रिशन व्हॅल्यू

१/३ भातात जवळपास ८० कॅलेरीज असतात. यात १ ग्रॅम प्रोटीन 0.1 ग्रॅम फॅट आणि 18 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. 

भात खावा कि चपाती, काय चांगले

भात आणि चपाती दोन्हीमध्ये व्हिटामिन बी असतं.  जे डीएनए बनवण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी गरजेचं आहे. दोघांमध्ये लोह्याचं प्रमाण समान असतं. मात्र भातात चपातीच्या तुलनेत फास्फोरस आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण कमी असतं. फास्फोरस किडनीसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि पेशींच्या दुरूस्ती फायदेशीर असते. तर आयरन लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी आणि मॅग्नेशिअम रक्तदाब आणि शर्कराची पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे.

भात आणि चपातीमध्ये या दोन्ही पदार्थांमध्ये एकाची निवड करायची झाल्यास तुम्ही चपातीची निवड करा. मात्र आजकाल ग्लुटेन फ्री डाएट जास्त प्रमाणात करण्यात येते. त्यासाठी लोकं चपाती ऐवजी भात खातात.  त्यामुळे हा योग्य पर्याय नाही आहे. कारण सफेद तांदूळ हे पॉलिश केलेले असतात. यात षोषक तत्व कमी असतात आणि ते सारखे प्रमाणे काम करतात. जर का तुम्हांला भातचं खायचा असेल तर ब्राऊन राइस खावा. 

rice

वेट लॉस करत असताना एका दिवसात किती कार्ब्स घ्यावे 

डाइट्री गाईड लाईननुसार, कार्ब्स तुमच्या एका दिवसात कॅलेरीज सेवन जवळपास ४५ ते ६५ टक्के उपलब्ध करतं. जर तुम्ही २००० कॅलरी डाएट प्लान घेत असाल तर तुम्हांला दररोज २२५ पासून ३२५ ग्रॅम कार्ब्सचं लक्ष्य ठेवलं पाहिजे. मात्र जर का तुम्ही वेगानं वजन घटवण्याचं लक्ष्य ठेवलं असेल तर तुम्हांला दिवसभरात केवळ ५० ते १५० ग्रॅम कार्ब्स खाण्याचं लक्ष्य ठेवलं पाहिजे. 

दररोज किती चपाती आणि भात खावा ?

जर का तुम्ही प्लेट भरून भात पूर्णपणे कव्हर होत असेल तर तुम्ही जवळपास ४४० कॅलरी घेत आहेत. त्यासाठी वेट लॉससाठी हे कंट्रोल करायला हवं. तुम्ही तुमच्या दुपारच्या डाएटमध्ये दोन चपाती आणि अर्धी वाटी भात खावा. अन्य सर्व भाजी आणि सलाड खावं. रात्रीच्या जेवणात खूपच हलकं डाएच घ्यावं. रात्री भात खाऊ नये. त्याऐवजी तुम्ही थोडंस तेल किंवा तुपासोबत एक पराठा खावा. याव्यतिरिक्त तुम्ही मुगाचा चिला देखील खाऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Weight loss Tips: वजन कमी करण्यासाठी रोज खा चपाती आणि भात  Description: चपाती भात अशा दोन गोष्टी आहेत ज्या भारतीय थाळीचा महत्त्वाचा हिस्सा आहे. या दोन्ही पदार्थांशिवाय कोणतीही थाळी पूर्ण होऊ शकतं नाही. मात्र वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ किती महत्त्वाचे आहेत हे जाणून घेऊया.
Loading...
Loading...
Loading...