Weight Loss Tips Marathi: या दोन पदार्थांचे करा सेवन, ताबडतोब वजन होईल कमी, वाचा सविस्तर 

बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणावत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण नाना तर्‍हेचे उपाय करतात. त्यात जिम लावणे, डाएट करणे, जॉगिंगला जाणे अशा उपायांचा त्यात समावेश आहे. अनेक लोक घरचे अन्न खाण्याऐवजी बाहेर जंकफूड खात असतात आणि त्यांचे वजन वाढत जाते. जंकफूड आणि बाहेरचे अन्न खाल्याने फक्त वजन नाही वाढत तर अनेक आजारांना निमंत्रणही मिळतं.

weight loss
वजन कमी करण्यासाठी खास टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत आहे.
  • वजन कमी करण्यासाठी अनेकजण नाना तर्‍हेचे उपाय करतात.
  • नैसर्गिक पद्धतीने वजन कमी होऊ शकतं.

Weight Loss Tips Marathi:  मुंबई : बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण नाना तर्‍हेचे उपाय करतात. त्यात जिम लावणे, डाएट करणे, जॉगिंगला जाणे अशा उपायांचा त्यात समावेश आहे. अनेक लोक घरचे अन्न खाण्याऐवजी बाहेर जंकफूड खात असतात आणि त्यांचे वजन वाढत जाते. जंकफूड आणि बाहेरचे अन्न खाल्याने फक्त वजन नाही वाढत तर अनेक आजारांना निमंत्रणही मिळतं. या आजारात उच्च रक्तदाब, हृदयविकार या आजारांचा समावेश आहे. पण नैसर्गिक पद्धतीने वजन कमी होऊ शकतं. जाणून घेऊया वजन कमी करण्याच्या खास टिप्स

आलं आणि त्रिफळाने पडेल फरक

फार कमी जणांना माहित आहे की आलं आणि त्रिफळामुळे वजन कमी होण्यास मदत होते. अनेक जण त्रिफळा आणि आल्याचे सेवन करतही असतील परंतु त्यांचे वजन कमी होत नाही. कारण आलं आणि त्रिफळा सेवन करण्याची पद्धत वेगळी असेल. आल्याचा चहा तसा लोकप्रिय आहे, आल्याचा चहाचे सेवन नियमित केल्यास वजन कमी होतं. तसेच त्रिफळा कोमट पाण्यात टाकून प्यायल्यानेही वजन कमी होतं. 


असे होईल वजन कमी

त्रिफळामुळे शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. त्रिफळात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तर आल्याच्या नियमित सेवनामुळे वजन नियंत्रणात राहतं. आल्यात अँटी इन्फ्लेमेटरी तत्व असता. त्यामुळे पोट भरलेलं असतं आणि फारवेळ भूक लागत नाही. आल्यामुळे शरीराज सूज होत नाही, तसेच पचनसंस्था आणखी मजबूत होते. 
 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी