Weight Loss Tips: पोटाची चरबी कमी करण्याचं आलंय टेन्शन?, चिंता नको फक्त रात्री झोपण्यापूर्वी खा 'हे' 4 पदार्थ

Weight Loss Food:वाढलेलं वजन कमी करणे कोणासाठीही सोपे नाही.कारण यासाठी एक्सरसाइजसोबतच तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. त्यामुळे जाणून घ्या रात्रीच्या वेळी काय खाणे योग्य आहे.

Belly Fat
रात्री झोपण्यापूर्वी हे 4 पदार्थ खावे, पोटाची चरबी होते कमी 
थोडं पण कामाचं
  • सध्याच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये वजन वाढणं (Weight gain) ही मुख्य समस्या बनली.
  • पोट आणि कंबरेभोवती चरबी ही वाढते. त्यामुळे शरीराचा एकूण आकारचा बिघडून जातो.
  • पोटाचा घेर वाढल्यास व्यक्तीला लाजिरवाणं आणि कमी आत्मविश्वास या समस्यांना ही सामोरं जावं लागतं.

मुंबई: How To Burn Belly Fat: सध्याच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये वजन वाढणं (Weight gain) ही मुख्य समस्या बनली. वजन वाढणं किंवा पोटाजवळ चरबी वाढणं ही समस्या सामान्य बनू लागली आहे. वजन वाढल्यास मधुमेह, हृदयविकाराचा (Heart Attack) झटका, उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा (High Cholesterol) धोका वाढतो. तसंच एवढंच नाही तर पोट आणि कंबरेभोवती चरबी ही वाढते. त्यामुळे शरीराचा एकूण आकारचा बिघडून जातो. पोटाचा घेर वाढल्यास व्यक्तीला लाजिरवाणं आणि कमी आत्मविश्वास या समस्यांना ही सामोरं जावं लागतं. 

वजन कमी करण्यासाठी रात्री खा हे पदार्थ

अनेकदा जंक फूड, तेलकट खाद्यपदार्थ, फास्ट फूड इत्यादी अशा गोष्टी आपण खातो. हे पदार्थ खाल्ल्यानं आपले आरोग्य बिघडते. तसंच व्यस्त लाईफस्टाइलमुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही. चला जाणून घेऊया त्या 4 पदार्थांबद्दल, जे रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास वजन झपाट्यानं कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा- स्वतःला फिट ठेवण्यासाठी शनाया कपूर करते 'हा' वर्कआऊट

दही 

रात्री जेवल्यानंतर दही (Curd) जरूर खा. त्यात कॅलरीज आणि प्रोटीन जास्त असतात. त्यामुळे दोन स्नायूंना ताकद मिळते. यासोबतच दह्यामध्ये असलेले मायक्रोन्यूट्रिएंट डायजेशन  बरोबर ठेवते आणि वजनही कमी करते.

बदाम  (Almonds)

जे लोकं काही कारणानं उशिरा झोपतात, अशा लोकांना अनेकवेळा रात्री भूक लागते. अशा परिस्थितीत तुम्ही काही बदाम खाऊ शकता, भूक भागवण्यासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. बदामात अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात आणि कॅलरीजही कमी असतात.

होल ग्रेन ब्रेडसह पीनट बटर

जर तुम्हाला रात्री भूक लागली असेल तर तुम्ही पीनट बटर  (Peanut Butter)लावून होल ग्रेन ब्रेडचे (Whole Grain Bread) 2 स्लाईस खाऊ शकता. हे मेटाबॉलिज्म बूस्ट होते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

केळ  (Banana)

असं म्हटलं जातं की, केळी खाल्ल्याने वजन वाढतं. मात्र त्यात असे अनेक न्यूट्रिएंट्स आढळतात जे वजन कमी करण्याचे काम करतात. या फळामध्ये असलेल्या फायबरमुळे जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. Timesnowmarathi.com याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी