पपई खाऊन वजन करा कमी, असा करा डाएटमध्ये समावेश

तब्येत पाणी
Updated Nov 12, 2020 | 15:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुम्ही जिममध्ये जाऊन तेथे अनेक तास घाम गाळून कंटाळला आहात का? असे करूनही वजन कमी होत नाहीये तर हा आहे तुमच्यासाठी उपाय

papa
पपई खाऊन वजन करा कमी, असा करा डाएटमध्ये समावेश 

थोडं पण कामाचं

  • भारतीय बाजारांमध्ये पपई सहजतेने आढळतात.
  • या फळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि कमी प्रमाणात कॅलरीज असतात.
  • पपईमध्ये व्हिटामिन ए,सी बी, कॅल्शियम, आर्यन आणि फॉस्फरससारख्या खनिजांचा समावेश आहे.

मुंबई: वजन कमी करणे(weight loss) आणि फिट राहणे(to fit) हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सध्याच्या फॅशनेबल युगात प्रत्येकाला सुंदर दिसायचे ाहे. अशातच लोक चरबी कमी करण्यासाठी तसेच वजन घटवण्यासाठी घरातच व्यायाम(exercise) करतात. अथवा जिममध्ये तासनतास घालवतात. यासोबतच डाएट प्लानही बनवतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात कॅलरीज तसेच फॅटचे प्रमाण कमीत कमी असेल. जर तुम्हीही वजन कमी कऱण्यासाठी डाएट प्लान(diet plan) शोधाताय तर येथे तुमच्यासाठी एक स्वादिष्ट डाएट प्लान आहे जो तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करेल. या डाएट प्लानचे नाव आहे पपई डाएट प्लान(papaya diet plan)

पपई एक उष्ण फळ आहे भारतीय बाजारांमध्ये पपई सहजतेने आढळतात. हे फळ खाण्यास अतिशय गोड आणि चविष्ट अते. पिवळा सुंदर रंग आणि गोड स्वादामुळे हे फळ अनेक डिशमध्ये आपली छाप पाडते. पपईमध्ये व्हिटामिन ए,सी बी, कॅल्शियम, आर्यन आणि फॉस्फरससारख्या खनिजांचा समावेश आहे. पपईमुळे केस, त्वचा आणि आरोग्य चांगले राहते. 

वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे पपई

या फळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी योग्य फळआहे. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. पपई सेल्युलाईट कमी करण्यास मदत करतात. केवळ गरच नव्हे तर या फळाच्या बिया आणि पानेही फायदेशीर आहेत. पानांचा रस हाय फिव्हर, डेंग्यूसारख्या आजार असलेल्यांना दिला जातो. पपईच्या बिया  किडनीमधून विषारी पदार्थ नष्ट करण्याचे काम करतात. 

पपई डाएट प्लान हा असा प्लान आहे जो महिन्यातून केवळ एकदा अथवा दोनदा केला पाहिजे. चांगल्या रिझल्टसाठी यात कोणतीही चूक करू नका. हा पपई डाएट प्लान ४८ तासांचा असतो. 

सकाळचा नाश्ता - पपई डाएट प्लान सुरूकरण्यासाठी सकाळी एक ग्लास पातळ बदामाचे दूध प्या. त्यानंतर ३० मिनिटांनी पपई सलाड खा. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी हाच नाश्ता करा. 

दुपारचे जेवण-दिवस पहिला- टोमॅटो, पालक, ऑलिव्ह, लसूण यांचे सवन करा. तुम्ही सलाडसोबतही भात खाऊ शकता. यासोबत एक ग्लास पपईचा रस प्या.

दुसरा दिवस- वांगे, पालक शिजवून त्यांचे सेवन करा. त्यानंतर एक ग्लास पपईचा रस प्या. 

स्नॅक्स टाईम - स्नॅक्ससाठी तुम्ही पपईच्या फोडी खाऊ शकता. अथवा पपई, अननस आणि लिंबूचा रस मिसळून स्मूदी बनवू शकता. 

रात्रीचे जेवण - दिवस पहिला - आपल्या आवडीच्या भाजीचे सूप बनवा आणि ताज्या पपईसोबत खा
दिवस दुसरा - थोडेसे ऑलिव्ह ऑईल, मीठ आणि काळी मिरी घालून एखादी हिरवी भाजी शिजवा आणि चपातीसोबत खा. या सोबत कापलेले पपई खा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी